मेरठ मध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून निर्घृण हत्या, आरोपीला अटक

[ad_1]

arrest
मेरठमधील सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील हाट बाजारमध्ये एका तरुणाने घराबाहेर झोपलेल्या दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. मुलीला घेऊन जात असल्याचे पाहून तिचे कुटुंबीयांनी पाठलाग केल्यावर आरोपींनी तिला नाल्यात फेकून दिले. लोकांनी मुलीला बाहेर काढले तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबा सोबत झोपलेल्या एका 2 वर्षाच्या चिमुकलीला बलात्काराच्या उद्धेशाने तरुणाने उचलून नेले. मुलीच्या घरच्या सदस्यांना जाग आल्यावर कुटुंबीयांनी आरडाओरडा करत आरोपी तरुणाचा पाठलाग केला. पकडतील या भीतीने आरोपीने मुलीला नाल्यात फेकले. नाल्यात बुडून त्या चिमुकलीचा दुर्देवी अंत झाला.

मुलीला नाल्यात फेकल्यानंतर आरोपीने स्वतः घटनास्थळावरून पळ काढला. शनिवारी सकाळी मुलीचा मृतदेह नाल्यात सापडल्याचे त्यांनी सांगितले. सध्या मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

Edited by – Priya Dixit   

 

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top