शिवसेनेकडुन भाऊबीज मिळाल्याच्या भावनेतून महिलेला अश्रू अनावर

दौंड तालुक्यातील निराधार महिलेला शिवसेनेचा आधार,शिवसेनेकडुन भाऊबीज मिळाल्याच्या भावनेतून महिलेला अश्रू अनावर…Shiv Sena’s support to a destitute woman in Daund taluka
डॉ.नीलम गोऱ्हे यांना एक फोन,नंतर दौंड तालुक्याच्यावतीने मदत

दौंड दि.०२ – कोरोना काळात निराधार महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.दौंड तालुक्या तील पारगाव येथील निराधार महिलेने रेशन नसल्याबाबत विधानपरिषद उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांना दूरध्वनी करून आपली व्यथा मांडली. यानंतर ना.डॉ.गोऱ्हे यांनी दौंड येथील पारगाव गावातील निराधार महिलेला पुढील तीन महिन्यांच्या शिधा उपलब्ध करून देण्याची सूचना दौंडचे माजी तालुकाप्रमुख व नगरसेवक अनिल सोनवणे यांना केली.

     ना.डॉ.गोऱ्हे यांनी उपसभापती कार्यालयाचे सचिव रवींद्र खेबुडकर यांनी सदरील महिलेला संजय निराधार योजनेत नाव नोंद करण्याच्या दृष्टीने पाठवा अशी सूचना केली. यानंतर तात्काळ त्यांच्या अर्जाबाबत कार्यवाही करण्याची सूचना तहसीलदार संजय पाटील यांना दिली. यानंतर पुढील महिन्यापासून या महिलेला संजय निराधार योजनेतून मदत मिळणार आहे. या सर्वांबद्दल महिलेने ना.डॉ.गोऱ्हे यांचे आभार मानले. 

  धान्याची मदत मिळाल्यानंतर महिलेला अश्रू अनावर झाले होते. यावेळी शिवसेना दौंड विधान सभा संघटक संतोष जगताप, उपतालुक प्रमुख सदाभाऊ लकडे, रमेश निवांगुणे,सर्जेराव म्हस्के, विभागप्रमुख भाऊसो बोत्रे,शहर संघटक नामदेव राहिंज,हरीश खोमणे,देवेंद्र कानपिळे आदी उपस्थित होते.यावेळी श्रीमती शोभा अनंत यांनी शिवसैनिकांच्या माध्यमातून भाऊबीज मिळाल्याची भावना बोलून दाखवली.यावेळी त्या खूप भावुक झाल्या होत्या.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: