पंढरपूरात नगरपालिकेच्यावतीने जंतुनाशक फवारणी

पंढरपूरात नगरपालिकेच्यावतीने जंतुनाशक फवारणी Disinfection spraying on behalf of the municipality in Pandharpur

पंढरपूर,30/04/2021- महाराष्ट्रात कोरोनाने कहर केलेला असून पंढरपुरात देखील दररोज 250 ते 300 रुग्ण पॉझिटीव्ह सापडत आहेत. त्यामुळे पंढरपूरात नगरपालिकेने जंतुनाशक फवारणी मोठ्या प्रमाणावर करावी अशी मागणी नागरिकांतून होत होती.

आज माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक दगडु नारायण धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग नंबर 11 मध्ये जंतूनाशक फवारणी मशिनच्या सहाय्याने करण्यात आली.यावेळी समाजसेवक गणेश धोत्रे, समाजसेवक गणेश पवार,संतोष बंदपट्टे ,राहुल बैरागी आदी उपस्थित होते.

ही जंतूनाशक फवारणी महावीरनगर,ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टी या भागात करण्यात आली असून वीरसागरनगरसह उर्वरित भागात येत्या दोन – तीन दिवसात जंतूनाशक फवारणी करण्यात येणार आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष दगडू नारायण धोत्रे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: