शस्त्र घेऊन परिसरात दहशत करणारा मुकेश बोधीवाले एमपीडीए अन्वये स्थानबध्द

शस्त्र घेऊन परिसरात दहशत करणारा मुकेश ऊर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले एमपीडीए अन्वये स्थानबध्द


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर शहरातील सदर बझार व विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, मुकेश ऊर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले, वय ३९ वर्षे,रा.बेडर पुल, लोधी गल्ली,सोलापूर हा मागील काही वर्षांपासुन सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन गैरकायद्याची मंडळी जमविणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, इच्छापुर्वक दुखापत करणे, घराविषयीक आगळीक करणे, घरफोडी, खुनाचा प्रयत्न करणे,सरकारी कामाता अडथळा निर्माण करणे, हयगईने मानवी जीवनास धोका पोहचविणे, घातक शस्त्रांनी धमकवणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने,अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे.

त्याच्या विरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण ०६ गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत.त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. मुकेश ऊर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचेविरुध्द सामान्य नागरिक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत.

मुकेश ऊर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२३ मध्ये क. ११० फौ.प्र.सं अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालुच ठेवली.

त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार सोलापुर शहर यांनी दि.२२/०४/२०२४ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास दि.२३/०४/२०२४ रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त एम.राज कुमार यांचे मार्गदर्शनाखाली,पोलीस उप- आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ.दीपाली काळे , पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे ,प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०२, सुनिल दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, अजित लकडे, वपोनि सदर बझार पोलीस ठाणे, पोउपनि/विशेंद्रसिंग बायस गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकों/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading