खडसे-महाजन पुन्हा एकत्र आले, पण…; ‘तो’ तीढा कायम!
हायलाइट्स:
- जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न.
- आजच्या बैठकीनंतरही जागा वाटपाचा तीढा कायम.
- एकनाथ खडसे, गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पुन्हा सर्वपक्षीय बैठक.
वाचा: मुख्यमंत्र्यांपुढं आमचं काही चालत नाही!; अजित पवारांचं मोठं विधान
जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज रात्री आठ वाजता सर्वपक्षीय नेत्यांच्या समितीमधील सदस्यांची बैठक अजिंठा विश्रामगृह येथे झाली. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, एकनाथ खडसे, आमदार शिरीष चौधरी, सुरेश भोळे, किशोर पाटील,प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील आदी उपस्थित होते. बैठकीनंतर सर्वपक्षीय पॅनलबाबत एकमत झाल्याचा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला असून, काही जागांवर तीढा कायम असला तरी लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.
वाचा: मंत्रिमंडळाची बैठक ‘डेक्कन ओडिसी’त!; मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले…
या जागांचा तीढा कायम
कोअर कमिटीच्या बैठकीत चाळीसगाव, रावेर, यावल, एनटी राखीव व महिला राखीव या जागांबाबत एकमत होऊ शकले नसल्याचे समजते. पुन्हा जागांबाबत चर्चा होणार असून निवडणूक जाहीर होण्याच्या आगोदर सर्वपक्षीय उमेदवार निश्चित होणार आसल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. जिल्हा बँकेच्या हितासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आसल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. बिनविरोध निवडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
अध्यक्षपदासाठी सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. सर्वपक्षीय पॅनल बाबत समिती सदस्यांच्या आणखी काही बैठका होणार असून त्यातून सर्व जागांबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
वाचा: पुलावरील खड्ड्यांनी घेतला मायलेकाचा बळी; आई वडिलांना भेटायला जाताना…