Heavy Rain Forecasts: पुढील २ तासांत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता


मुंबई: पुढील २ ते ३ तासात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार असून बाहेर जाताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. विभागाने ही माहिती नुकतीच जाहीर केली आहे. (heavy rain forecasts with thunderstorms in some districts in next 2 3 hours information by imd mumbai)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये, तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये, आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि नाशिकमझ्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोनाचा संसर्ग येतोय आटोक्यात; पाहा, संपूर्ण राज्यातील ताजी स्थिती!

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रतितास इतका असणार आहे. या पूर्वी हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, नाशिक, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तर उद्या मंगळवार, २८ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, धुळे आणि जळगावला रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईसह रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार आणि औरंगाबादसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली महत्वाची मागणी

जळगाव जिल्ह्यात वीज पडून महिलेसह बालिकेचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात आज सोमवारी वीज पडून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेसह १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात बहुसंख्य भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी दिली. त्या दरम्यान या घटना घडल्यात.

क्लिक करा आणि वाचा- सरकारच्या धोरणाविरोधात रोष; कोल्हापुरातील रंगकर्मींनी केले पितृस्मृती आंदोलनSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: