अमेरिका: राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घेतला करोना लशीचा बुस्टर डोस


वॉशिंग्टन: करोना संसर्गाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या अमेरिकेत लसीकरणावर भर दिला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी करोना लशीचा बुस्टर डोस घेतला आहे. त्यांनी फायजर लसीचा बुस्टर डोस घेतला. करोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना बु्स्टर डोस देण्यात येत आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी बुस्टर डोस प्रभावी ठरेल असे म्हटले जात आहे.

अमेरिकेत ६५ वर्षांवरील वयाच्या व्यक्तींना फायजर लशीचा बुस्टर डोस दिला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच संबंधित प्राधिकरणाने याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी बुस्टर डोस घेतला. बायडन यांचे वय ७८ वर्ष आहे. बायडन यांनी बुस्टर डोस घेण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. अधिकाधिक नागरिकांनी करोना लस घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. करोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम जाणवले नसल्याचे त्यांनी सांगितले.

चिंताजनक! करोनामुळे जगभरातील आयुर्मानात घट
दरम्यान, अमेरिकेत फायजर आणि मॉडर्ना या दोन लशीचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सध्या फायजरलाच बुस्टर डोस देण्यास मंजुरी मिळाली आहे. मॉडर्ना लशीच्या बुस्टर डोसला मंजुरी मिळण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

चिनी लशीचा दिलासा! डेल्टा वेरिएंटविरोधात ७९ टक्के प्रभावी असल्याचा दावा
अमेरिका व इतर विकसित, श्रीमंत देशांमध्ये बुस्टर देण्यात येत आहे. मात्र, या बुस्टर डोसचा परिणाम गरिब देशांच्या लसीकरणावर होण्याची भीती आहे. जगभरात गरिब, विकसनशील देशांमध्ये लशी अभावी लसीकरण मोहीम धीम्या गतीने सुरू आहे. त्यातच या बुस्टर डोसमुळे लस पुरवठा कमी होण्याची भीती आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: