महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेत विशेष कार्यक्रम

महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेत विशेष कार्यक्रम
   तिसंगी,जि सोलापूर / शंकरराव पवार - महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगलीच्या वतीने सेवा निवृत्त शिक्षक, शिक्षिका व सेवक सन्मान सोहळा व आजी सेवक स्नेह मेळावा श्री जानुबाई विद्यालय विरळी ता.माण जि.सातारा या विद्यालयात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन आर.एस. चोपडे हे होते . प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे जेष्ठ सल्लागार वाघमोडे ए.एम.,शेळके एस,व्ही, सौ चोपडे यु आर मॅडम,श्री कदम एस.के आदी उपस्थित होते.

संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती एल टी शेंडगे मॅडम, सचिव पाटील एस ए सर ,खजिनदार अनुसे एस व्ही सर ,समन्वय समितीचे अध्यक्ष वाघमोडे डी ए सर ,सचिव सरगर बी पी सर तसेच स्वामी पी डी, स्वामी पी बी, हेगडे डी के, शेंडगे एस एस व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

 विद्यालयाचे मुख्याध्यापक माने के के सर यांनी सर्व मान्यवरांचे शाल व बुके देऊन स्वागत केले.

संस्थेच्यावतीने ट्रॉफी व बुके देऊन संस्थेतील सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुण गौरव करणेत आला.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रंथ व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांनी सत्कार केला .संस्थेचे माजी मुख्याध्यापक शिकलगार डी एफ व चौरे एस टी सर यांनी मार्गदर्शन केले .

संस्थेचे सल्लागार वाघमोडे सर,कदम सर,शेळके सर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत संस्थेचा हिरक महोत्सवी वर्षांतील सर्व कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष चोपडे सर यांनी संस्थेच्या कार्याचा चौफेर आढावा घेत सर्वाना नव्या जोमाने काम करणेची प्रेरणा दिली .तसेच विरळी शाखेने उत्तम नियोजन केलेबद्दल मुख्याध्यापक सर्व स्टाफचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ नलवडे व्ही यु मॅडम व जाधव व्हि एन यांनी केले .आभार प्रदर्शन श्रीमती शेंडगे एल टी मॅडम व बंडगर व्ही इ  यांनी केले.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: