bhabanipur by election : भवानीपूर पोटनिवडणूक होणार का? कोलकाता हायकोर्टाने दिला निर्णय


कोलकाताः भवानीपूर विधानसभेची पोटनिवडणुकीवर कोलकाता हायकोर्टात ( calcutta high court ) आज सुनावणी झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ही भवानीपूरची पोटनिवडणूक लढवत आहेत. भवानीपूरची पोटनिवडणूक रद्द केली जाणार नाही आणि गुरुवारी ३० सप्टेंबरला मतदान होईल, असा निर्णय हायकोर्टाने दिला आहे. यामुळे ममता बॅनर्जींना दिलासा मिळाला आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याची ‘घटनात्मक अपरिहार्यता’ आहे, या निवडणूक आयोगाच्या युक्तिवादाला एका जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी झाली.

मुख्यमंत्रीपदावर राहण्यासाठी ममता बॅनर्जींना ही पोटनिवडणूक जिंकणं गरजेचं आहे. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. पण भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. मात्र, राज्यघटनेनुसार मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्यासाठी त्यांना ६ महिन्यांच्या आत आमदार होणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येईल. यामुळे भवानीपूरची पोटनिवडणूक ममता बॅनर्जींसाठी महत्त्वाची आहे.

भवानीपूर हा ममता बॅनर्जींचा पारंपरिक मतदारसंघा मानला जातो. यापूर्वी त्यांनी २०११ मध्ये इथून निवडणूक लढवली होती आणि त्या विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. पण या वर्षी एप्रिल – मे झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे सोवनदेब चटोपाध्याय हे भवानीपूरमधून निवडून आले. मात्र, त्यांनी ममता बॅनर्जींसाठी आमदारकीचा राजीनामा दिला. यामुळे भवानीपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे.

bhabanipur election : भवानीपूर घटनेप्रकरणी निवडणूक आयोगाने मागितला अहवाल; पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी

भाजपसाठीही भवानीपूरची पोटनिवडणूक महत्त्वाची आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने ममता पराभव करण्यासाठी मोठी ताकद लावली होती. पण भाजपला यश आले नाही आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने बहुमत मिळवलं. आता ममतांचा पराभव करण्यासाठी भाजपने पुन्हा ताकद लावली आहे.

Bhawanipur Bypoll 2021: तृणमूलकडून दिलीप घोष यांच्यावर हल्ला, भाजपचा दावा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: