पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी pandharpur police
 पंढरपूर / प्रतिनिधी, २८/०९/२०२१ :- पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मोटार सायकल चोरी करणारी चोरांची टोळी जेरबंद करुन त्यांचेकडुन १८,००,००० / - रुपये किंमतीच्या एकूण ३१ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. पंढरपूर शहर पोलीस ठाणे दिनांक १९/०६ /२०२१ रोजी दाखल गुन्हयाचे तपासकामी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपूर विभाग ,पंढरपूर व पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे तपास करीत असताना पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ,पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील खजुरी ,ता.आळंद ,जि.गुलबर्गा,राज्य कर्नाटकमधील आरोपीने सदरचा गुन्हा केला आहे. सदर इसमावर पाळत ठेवत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम व त्यांचे पथकास बातमी मिळाली की , सदर इसम त्याचे राहते घरी आहे त्यामुळे त्यास त्याचे घरी जावून त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असून इतर मोटारसायकलीही त्याचा पिंपरी,जि.पूणे येथील साथीदारासोबत चोरली असल्याचे सांगितल्याने त्यास सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करुन त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदर गुन्हयातील १ मोटार सायकल व इतर १४ मोटार सायकली अशा १५ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत . नंतर सदर आरोपीचा साथीदार पिंपरी ,जि.पूणे येथे त्याचे राहते घरी पाळत ठेवून त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याचे सांगितल्यावरुन त्यास सदर गुन्हयात अटक केली आहे .अटके दरम्यान त्याने १६ मोटार सायकली काढून दिल्याने सदर मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.वरील प्रमाणे गुन्हयात जप्त केलेल्या मोटार सायकली या पंढरपूर शहरातील व अकलूज,मंद्रुप,मोहोळ , सोलापूर शहर ,खडक ,खेड ,इंदापूर ,मावळ , शिरुर , हवेली ,यवत , तळेगाव दाभाडे ,जेजूरी , अंबेगाव ,लाहोरा ,उमरगा ,फलटण इत्यादी गावातील आहेत . 

   सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम , अपर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपूर विभाग , पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदुम ,पोहेकॉ शरद कदम ,पोहेकॉ बिपीनचंद्र ढेरे ,पोहेकॉ सुरज हेंबाडे ,पोहेकॉ  राजेश गोसावी , पोहेकॉ इरफान मुलाणी,पोना  इरपान शेख , पोना शोएब पठाण , पोना महेश पवार ,पोना सुनिल बनसोडे ,पोना सुजित जाधव , पोकॉ संजय गुटाळ , पोकॉ समाधान माने ,पोकॉ विनोद पाटील , पोकॉ अर्जून केवळे ,पोकॉ अन्वर आतार सायबर पोलीस ठाणे  यांनी केली असून सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस हवालदार इरफान मुलाणी , पोलीस नाईक इरपान शेख व शोएब पठाण हे करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: