विचित्र प्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे याचं कारण सर्वसामान्य माणूस या सर्व प्रक्रियेपासून दूर गेला आहे – तुषार गांधी

तुषार गांधींच्या हस्ते विशेषांक प्रकाशन,विचार संगोष्ठी व पुरस्कार वितरण संपन्न

अब की बार चार सौ पार नव्हे तर संविधान होणार हद्दपार- तुषार गांधी

सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०४/२०२४ – सर्वसामान्य माणूस पाच वर्षातून एकदा मतदान करतो आणि विसरून जातो. त्याच्या मताच्या बळावर राजकारणी कोट्यावधी रुपयाची माया जमवतात. विचित्र प्रकारचे राजकारण सध्या देशात सुरू आहे याचं कारण सर्वसामान्य माणूस या सर्व प्रक्रियेपासून दूर गेल्यामुळे हे घडत आहे. सध्या आपकी बार चार सौ पारचा नारा दिला जात आहे मात्र असं झालं तर संविधान होईल हद्दपार संविधान गया तो राष्ट्र गया असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

वर्धमान विश्व प्रतिष्ठान आणि पंचरंग प्रबोधिनी रौप्य महोत्सव समितीच्यावतीने भगवान महावीर जीवन व विचार शोध व बोध विशेषांकाचे प्रकाशन, महावीर व महात्मा गांधी या विषयावर संगोष्ठी आणि पुरस्कार वितरण अशा तीन उपक्रमांचे आयोजन स्मृति मंदिरात करण्यात आले होते. त्यावेळी महात्मा गांधी याचे पणतु व लेखक तुषार गांधी बोलत होते.

कार्यक्रमास भाई विलास शहा,रावसाहेब पाटील, चंदुकाका सराफ चे किशोर शहा बारामती, स्त्री रोगतज्ञ डॉ सतीश दोशी अकलुज,पदम राका,मिलिंद फडे पुणे, स्वरूपा राजेंद्र पाटील यड्रावकर जयसिंगपूर , प्रा.नरेश बदनोरे,उपेंद्र ठाकूर,भूषण देशमुख, डॉ.विजय पाटील आदींसह ज्येष्ठ नागरिक गांधी परिवारांचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्राणीमित्र विलास शिवलाल सर्वोदय ट्रस्ट माढा आणि स्नेहालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.रावसाहेब पाटील यांना प्रा.ग.प्र.प्रधान पुरस्कार,अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राचे प्रकाशक व व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांना डॉ.नरेंद्र दाभोळकर प्रेरणा पुरस्कार,अजित फौंडेशनच्या विनया आणि महेश निंबाळकर यांना साधना आणि बाबा आमटे सेवावृती दाम्पत्य पुरस्कार तर धन्यकुमार पटवा यांना स्व.वालुबाई शहा प्राणीमित्र पुरस्कार तुषार गांधी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराराचे स्वरुप रुपये अकरा हजार रोख,स्मृती चिन्ह,सन्मानपत्र व शाल-श्रीफल असे होते.

यावेळी पंचरंग प्रबोधिनी रौप्य महोत्सव समितीच्यावतीने डॉ.सरिता नलिनचंद कोठाडिया सोलापूर ,ॲड प्रिया प्रविणकुमार शहा मुंबई, श्रीमती सुजाता निरंजन शहा पुणे, स्वरुपा राजेंद्र पाटील यड्रावकर जयसिंगपूर आणि डॉ. स्वाती आनंद दोभाडा यांना वीर माता त्रिशला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र,भेटवस्तू,शाल व श्रीफल असे होते.

यावेळी हिना सिंगी यांनी स्वागत गीत गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सोनम पाटील यांनी केले.आभार ॲड.अजित कुलकर्णी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *