केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले छत्तीसगड,आसाम मध्यप्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले दि.१२ एप्रिलपासून छत्तीसगड ,मध्यप्रदेश,आसाम आणि राजस्थान दौऱ्यावर

भाजप एनडीए उमेदवारांचा रामदास आठवले करणार प्रचार

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.७ – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या दि.१२ एप्रिल पासून छत्तीसगड,मध्य प्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर रवाना होणार आहेत.एनडीए चा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एनडीए चे राष्ट्रीय स्तरावर स्टार प्रचारक ठरले आहेत. देशभर सर्व राज्यांत भाजप उमेदवार आपल्या प्रचारासाठी ना रामदास आठवले यांची सभा आयोजित करीत आहेत.

दलित बहुजनांचे लोकप्रिय राष्ट्रीय नेतृत्व एक सेलिब्रिटी वलय लाभलेला चेहरा म्हणून ना. रामदास आठवले यांना भाजप उमेदवार प्रचारासाठी निमंत्रित केले जात आहे.

ना.रामदास आठवले येत्या दि. १२ एप्रिल रोजी छत्तीसगड मधील रायपूर येते भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.दि.१३ एप्रिल रोजी मध्यप्रदेश मधील भोपाळ येथे भाजप उमेदवारांचा ते प्रचार करणार आहेत.

दि.१४ एप्रिल रोजी सकाळी दिल्लीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संसदेत आयोजित कार्यक्रमात ना.रामदास आठवले उपस्थित राहतील. त्याच दिवशी दि.१४ एप्रिल रोजी दुपारी ना.रामदास आठवले मुंबईत चैत्यभूमी येथे उपस्थित राहून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दि.१५ एप्रिल रोजी ना.रामदास आठवले हे आसाम चा दौरा करणार असून आसाम मध्ये हेलिकॉप्टर द्वारे ना.रामदास आठवले प्रचार दौरा करणार आहेत.आसाम मध्ये रिपब्लिकन पक्षाचे ५ उमेदवार लोकसभा निवडणुक लढत आहेत.त्यानंतर १७ एप्रिल रोजी ना.रामदास आठवले राजस्थानमधील जयपूर येथे ना रामदास आठवले भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *