महावीर स्वामी जन्मकल्याणकानिमित्त पुण्यात खुली निबंध स्पर्धा 2026,पारितोषिक वितरण सोहळ्याची तयारी

महावीर स्वामी जन्मकल्याणकानिमित्त पुण्यात खुली निबंध स्पर्धा 2026,पारितोषिक वितरण सोहळ्याची तयारी

अहिंसा जागृती मंच, पुणे आयोजित निबंध स्पर्धा; ८ मे रोजी होणार भव्य पारितोषिक समारंभ

पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज – भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणका निमित्त पुण्यात अहिंसा जागृती मंच च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या निबंध स्पर्धा 2026 चा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विजयकांत कोठारी अध्यक्ष महावीर प्रतिष्ठान सॉलिसबरी पार्क पुणे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद फडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. कमलकुमार जैन उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असून समाजामध्ये अहिंसा, विचारप्रबोधन आणि बौद्धिक विकासाला चालना देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या कार्यक्रमाची वेळ शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी दुपारी ३:४५ वाजता महावीर प्रतिष्ठान सॉलिसबरी पार्क महर्षीनगर पोलिस चौकीसमोर पुणे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या उपक्रमासाठी विविध मान्यवरांचे सहकार्य लाभले असून जैन समाज तसेच पुणेकर नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व आयोजकांचेवतीने जागृती मंच पुणे अध्यक्ष राजेंद्र सुराणा, स्पर्धा समन्वयक श्रीपाल ललवानी,सचिव प्रदीप फिरोदिया यांनी आवाहन केले आहे.

या कार्यक्रमासाठी जवाहर गुमते ,विजय पारख,नितीन शहा यांच्याशी संपर्क साधावा.या कार्यक्रमाचे सौजन्य संजय कांतीलाल चोरडिया जैन जागृती पुणे,स्व.चांदकुंवरबाई नवलखा यांच्या स्मरणार्थ श्री शांतीलाल दगडूलाल नवलखा पुणे यांचे असून या कार्यक्रमासाठी महावीर प्रतिष्ठान सॅलिस्बरी पार्क यांचा सहयोग आहे.

Leave a Reply

Back To Top