बोईसरमध्ये महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला; पालघर पोलिसांनी आरोपीला केली अटक

पालघर पोलिसांची मोठी कारवाई! जबरी चोरीचा प्रयत्न करून गंभीर दुखापत करणारा आरोपी जेरबंद

बोईसरमध्ये महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला; पालघर पोलिसांनी आरोपीला केली अटक

पालघर|ज्ञानप्रवाह न्यूज –दि.११/०५/२०२६ रोजी फिर्यादी पुजा दक्षीला मखवाना,वय २८ वर्षे, रा.बी.विंग १०२ मंगलम अर्पामेन्ट अनुग्रह हॉटेल जवळ बोईसर ता. जि.पालघर या राहत असलेल्या बिल्डींगखाली कुत्र्यांना चपाती देवुन पुन्हा घरात जात असताना एक अनोळखी इसम याने फिर्यादीच्या गळयातील मंगळसुत्र जबरीने खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीने त्यास विरोध केला असता सदर अनोळखीत इसम याने त्याच्या हातातील छोट्या धारधार हत्याराने फिर्यादीच्या चेहऱ्यावर वार केला. त्यावेळी तो वार चुकविण्याचा प्रयत्न केला असता तो फिर्यादीचे नाकावर लागुन दुखापत झाली. फिर्यादीने आरडाओरड केली असता सदर अनोळखी इसम हा पळुन गेला. तरी सदर इसमाने जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करून फिर्यादीस गंभीर दुखापत केली म्हणुन बोईसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १ १८२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक यतिश देशमुख पालघर यांचे मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस ठाणेचे व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे तपास पथक तयार करण्यात आले होते. बोईसर पोलीस ठाणेकडील पथकाने सिसिटिव्ही फुटेजची पडताळणी करून तसेच तांत्रिक विश्लेषन व गोपनीय माहितीच्या आधारे अज्ञात आरोपीस निष्पन्न करून आरोपीत भगवान शांताराम चव्हाण वय ४० वर्षे, राहणार सालवड, केदु मोरे यांची रुम, पाण्याच्या टाकीजवळ, बोईसर,ता.जि.पालघर,मुळ राहणार आजोंदे,ता.मालेगाव जि.नाशिक यास दि.१६/०५/२०२६ रोजी बोईसर सालवड परिसरातून ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.

आरोपीत यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि.२०/०५/२०२६ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक/चंद्रकांत हाके, नेमणुक बोईसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख पालघर,अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे पालघर, उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, पोउपनिरी/चंद्रकांत हाके,पोहवा/विजय दुबळा,पोहवा/जयराम चौधरी, पोहवा/सचिन जाधव, पोना/योगेश गावित, पोअंम/गणेश व्हसकोटी, पोअंम/मयुर पाटील, पोअंम/धीरज साळुंखे, पोअंम/देवेंद्र पाटील,पोअंम/मच्छिंद्र घुगे,पोअंम/सचिन सोनवणे,पोअंम/रोहित पाटील सर्व नेमणुक बोईसर पोलीस ठाणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Back To Top