छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा

[ad_1]

Prithviraj Chavan
सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.विरोधी पक्ष या वरून राज्य सरकारला जबाबदार ठरवून चांगलेच धारेवर धरले आहे.या प्रकरणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. या साठी जबाबदार असलेल्या नेत्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ते म्हणाले, या प्रकरणी राजनाथ सिंह किंवा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा. 

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा असा हा अपमान करण्यात आला आहे. त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. 

पंतप्रधानांना या कार्यक्रमाच्या उद्घाटनाची घाई होती का, असे अनेक प्रश्न आहेत, पण त्यांचे उत्तर मिळत नाही. जनतेची माफी मागून प्रश्न सुटणार नाही.अजित पवारांचा निषेध करणं हे नाटकच आहे. मुख्यमंत्रीचें वक्तव्य की वाऱ्यामुळे पुतळा पडला.असं म्हणून माफी मागून काहीही होणार नाही. कोणाला तरी याची जबाबदारी स्वीकारावी लागणार. राजीनामा द्यावा लागणार. मग ते राजनाथ सिंह असो किंवा पीडब्ल्यूडीचे मंत्री असो किंवा देवेंद्र फडणवीस असो. राजीनामा द्यावाच लागणार तो पर्यंत जनता शांत बसणार नाही. 

Edited by – Priya Dixit 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top