बिर्याणी खा,एक लाखाचे बक्षीस जिंका, इथे झाली ही अनोखी स्पर्धा

[ad_1]


बोचे फूड एक्सप्रेस ट्रेन हॉटेल, कोईम्बतूर मध्ये एक स्पर्धा ठेवली. हे हॉटेल नुकतेच कोईम्बतूर रेल्वे स्टेशनच्या कॅम्पसमध्ये सुरू झाले आहे. यामध्ये चिकन बिर्याणी खाणाऱ्यावर लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. 30 मिनिटांत 6 प्लेट चिकन बिर्याणी खाणाऱ्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात येईल, अशी अट या स्पर्धेत ठेवण्यात आली होती.

 

हॉटेल मालक 4 थाळी बिर्याणीची खाल्यास 50 हजार रुपये बक्षीस देत होते आणि 3 थाळी खाल्यास 25 हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जात होते.

 

स्पर्धेची माहिती मिळताच हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्यांची इतकी गर्दी होती की तिथे पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. केरळ आणि कोईम्बतूर येथील हजारो बिर्याणीप्रेमी हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी पोहोचले.

Edited By – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top