विराट कोहलीच्या RCBने बाजी मारली, पंजाबचा पराभव करत प्लेऑफचे तिकिट मिळवले


शारजाह: चांगल्या सुरूवातीनंतर पंजाब किंग्जच्या मधळ्या फळतील फलंदाजांना धावा करण्यात अपयश आल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएलच्या १४व्या हंगामातील ४८व्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जवर ६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत आरसीबीने १६४ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल पंजाबला १५८ धावा करता आल्या.वाचा- Video: चेंडूच्या मागे फिल्डर नव्हे तर फलंदाज पळत गेला; पाहा IPL मध्ये काय झाले

विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जला कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी शानदार सुरूवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९१ धावा केल्या. राहुल ३९ धावांवर बाद झाला तेव्हा पंजाबने १०.५ षटकात ९१ धावा केल्या होत्या. राहुलच्या जागी आलेला निकोलस पुरन फक्त ३ धावांवर बाद झाला. तर अॅडम मार्करामने १४ चेंडूत २० धावा केल्या. तो बाद झाल्यावर सरफराज खान शून्यावर माघारी परतला. चांगल्या सुरुवातीनंतर पंजाबचा डाव पुन्हा एकदा गडगडला.

वाचा- कर्णधाराला वाचवण्यासाठी IPLमधील संघ हा प्रकार करतात; गौतम गंभीरने केला मोठा आरोप

अखेरच्या काही षटाकत सलामीवीर मयांक अग्रवलाने धावा वाढवण्याचा प्रयत्न केला. पण तो ५७ धावांवर बाद झाला. त्याने ४२ चेंडू खेळले, यात २ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. पंजाबला अखेरच्या १२ चेंडूत २७ धावांची गरज होती. मैदानात स्फोटक फलंदाज शाहरुख खान आणि मोईसेस हेन्निक्स होते. अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी १९ धावांची गरज होती. पण पहिल्याच चेंडूवर शाहरूख खान धावाबाद झाला. दुसऱ्या चेंडूवर २, तिसऱ्या चेंडूवर १, आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा २ धाव घेण्यात पंजाबला यश आले. अखेरच्या २ चेंडूवर त्यांना १४ धावांची गरज होती. हेन्निक्स पाचव्या चेंडू षटकार मारला. आत त्यांना अखेरच्या चेंडूवर ८ धावा हव्या होत्या. आरसीबीच्या गोलंदाजाने नो बॉल टाकला तर पंजाबला संधी होती. पण आरसीबीच्या गोलंदाजाने कोणतीही चूक केली नाही. अखेरच्या चेंडूवर पंजाबला फक्त एक धाव घेता आली आणि बेंगळुरूने सामना ६ धावांनी जिंकला आणि प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले.

वाचा- आयपीएलशतकानंतर पुण्याच्या ऋतुराजने सर्वांचे मन जिंकले; म्हणाला, टीम आधी मग…

त्याआधी विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीची सुरुवात चांगली झाली. विराट आणि देवदत्त पडिक्कल यांनी ६८ धावांची भागिदारी केली. विराट २५ धावांवर बाद झाला. त्या पाठोपाठ डॅनियल ख्रिस्टिन शून्यावर माघारी परतला. त्यामुळे आरसीबीची अवस्था २ बाद ६८ अशी झाली. तर सलामीवीर देवदत्त ४० धावांवर बाद झाला. आरसीबीने ११.४ षटकात ३ बाद ७३ इतक्या धावा केल्या होत्या. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने धमाकेदार फलंदाजी केली. त्याने ३३ चेंडूत ५७ धावा केल्या. त्याला एबी डिव्हिलियर्सने १८ चेंडूत २३ धावा करत चांगली साथ दिली. अखेरच्या काही षटकात आरसीबीने धावा करण्याच्या प्रयत्नात विकेट गमावल्या. त्यांनी २० षटकात ७ बाद १६४ धावा केल्या. पंजाब किंग्जकडून मोईसेस हेन्निक्सने चार षटकात फक्त १२ धावा देत ३ तर मोहम्मद शमीने ३९ धावा देत ३ विकेट घेतल्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: