Lakhimpur violence: ‘मला सोडा, जाऊ द्या…’, लखीमपूर हिंसाचारात मंत्र्यांच्या ड्रायव्हरचा नाहक बळी?


हायलाइट्स:

  • मंत्रीपुत्र आशिष मिश्र याच्यावर शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा आरोप
  • मृतांत तीन भाजप कार्यकर्ते आणि मिश्रा यांच्या ड्रायव्हरचाही समावेश
  • आंदोलकांच्या गर्दीनं केलेल्या मारहाणीनंतर ड्रायव्हरचा मृत्यू

लखीमपूर खीरी, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी जिल्ह्यात रविवारी अचानक उफाळून आलेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसहीत आठ जणांचा मृत्यू झालाय. यात तीन भाजप कार्यकर्ते आणि मंत्र्यांच्या वाहन चालकाचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू आणि त्याच्या समर्थकांनी आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांच्या अंगावर गाडी चढवून त्यांना चिरडल्याचा आरोप करण्यात येतोय. या घटनेनंतर तीव्र संतापलेल्या गर्दीनं केलेल्या मारहाणीत तीन भाजप कार्यकर्त्यांसहीत टेनी यांच्या ड्रायव्हरला आपले प्राण गमवावे लागलेत.

आंदोलकांनी पेटवल्या गाड्या

यावेळी, संतापलेल्या आंदोलकांनी आशिष मिश्रा यांच्या गाडीसहीत तीन गाड्याही पेटवून दिल्या. इतर वाहनं पलटवण्यात आली. लखीमपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यासहीत १५ जणांविरोधात एफआयआर दाखल केली असली तरी अद्याप या घटनेत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Lakhimpur Kheri violence: ‘मी फक्त मंत्री-खासदार नाही’ म्हणणाऱ्या अजय मिश्र यांची खरी ओळख
Lakhimpur Kheri violence: शेतकऱ्यांना चिरडलं, मंत्रीपुत्र आशिष मिश्रा विरुद्ध गुन्हा दाखल

आंदोलकांकडून मारहाणीनंतर ड्रायव्हरचा मृत्यू

या दरम्यान, ड्रायव्हर मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत टेनी यांच्या गाडीचा ड्रायव्हर गर्दीसमोर हात जोडून आपल्याला सोडून देण्यासाठी विनंती करताना दिसतोय. या व्हिडिओत रक्तबंबाळ अवस्थेत दिसणारा ड्रायव्हर अतिशय घाबरलेल्या अवस्थेत दिसत होता. ‘दादा, मला सोडून द्या, मला जाऊ द्या’ अशा विनवण्या तो गर्दीला करत होता.

आशिष मिश्राविरोधात गुन्हा दाखल

या हिंसाचारानंतर मंत्रीपुत्र आशिष मिश्रा याच्याविरोधात तिकुनिया पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलीय. आशिष मिश्रावर गाडी चालवण्याचा आरोप आहे.

मात्र, आपला मुलगा घटनास्थळी नव्हताच असा दावा केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेनी यांनी केलाय. आशिष मिश्रानंही आपल्यावरचे आरोप साफ खोटे असल्याचं म्हटलंय.
Lakhimpur Kheri violence: पोलिसांनी रस्त्यावर उभा केला ट्रक, अखिलेश यादवांना लखीमपूरला जाण्यापासून रोखलं
​VIDEO: ‘हात तर लावून दाखवा’, लखीमपूरला जाणाऱ्या प्रियांका गांधींनी पोलिसांना शिकवला कायदाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: