e-Shram पोर्टलवर करा नोंदणी; ३८ कोटी स्थलांतरित कामगारांना होणार फायदा


हायलाइट्स:

  • केंद्र सरकारने २६ ऑगस्ट २०२१ रोजी ई-श्रम पोर्टल लाँच केले.
  • चौथ्या आठवड्यात १.७१ कोटीपेक्षा जास्त असंघटित कामगारांची नोंदणी झाली.
  • ५ व्या आठवड्यात एकूण २.५१ कोटीहून अधिक नोंदणी झाली आहे.

नवी दिल्ली : देशभरातील २.५ कोटींहून अधिक असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे, अशी माहिती कामगार मंत्रालयाने रविवारी (३ ऑक्टोबर) दिली. हे पोर्टल केंद्र सरकारकडून २६ ऑगस्ट २०२१ रोजी लाँच करण्यात आले. हे पोर्टल म्हणजे स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसह असंघटित कामगारांचा पहिला डेटाबेस आहे.

गुंतवणुकीच्या अमाप संधी; तिसऱ्या तिमाहीत IPO चा पूर, ८० हजार कोटींचे इश्यू धडकणार
निवेदनानुसार, कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, चौथ्या आठवड्यात १.७१ कोटीपेक्षा जास्त असंघटित कामगारांची नोंदणी झाली आणि ५ व्या आठवड्यात एकूण २.५१ कोटीहून अधिक नोंदणी झाली आहे.

तेजी परतली; सेन्सेक्सची ६०० अंकांची झेप, गुंतवणूकदारांची एक लाख कोटींची कमाई
३८ कोटी कामगारांना फायदा होणार
ई-श्रम पोर्टल देशातील ३८ कोटीहून अधिक असंघटित कामगारांची मोफत नोंदणी करणार असून त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांसंबंधीच्या वितरणासाठी मदत करेल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी असंघटित क्षेत्रातील ३८ कोटी कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी गेल्या महिन्याच्या अखेरीस ई-श्रम पोर्टल सुरू केले.

सणासुदीची खरेदी; सोनं स्वस्त होणार की महागणार, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
ज्या कामगारांना पोर्टलवर नोंदणी करायची आहे त्यांच्या मदतीसाठी सरकारने राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक – १४४३४ प्रसिद्ध केला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचे एकत्रीकरण करणे हा आहे. पोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती राज्य सरकारांच्या विभागांसोबतही शेअर केली जाईल. हे पोर्टल बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार, रस्त्यावरील विक्रेते, घरगुती कामगार, कृषी कामगार, दुग्ध व्यवसायी, मच्छीमार, ट्रक चालकांसह सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करेल.

पँंडोरा पेपर्सनं उडवली जगभरात खळबळ; करचुकव्यांच्या यादीत सचिन तेंडुलकरसह ३०० भारतीय
कामगारांना काय फायदा होणार?
जर एखाद्या कामगाराने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली, तर त्याला २ लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा लाभ मिळेल. यामध्ये सरकारकडून एक वर्षाचा हप्ता दिला जाईल. जर नोंदणीकृत मजूर अपघाताचा बळी ठरला असेल, त्याचा मृत्यू झाला असेल किंवा संपूर्ण अपंगत्व आले असल्यास त्याला दोन लाख रुपये मिळतील. तसेच अंशत: अपंगांसाठी विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपये दिले जातील.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: