टी-२० मध्ये बाबर आझमने केला नवा विक्रम; ख्रिस गेल, विराट कोहलीला टाकलं मागे


कराची : पाकिस्तान क्रिकेटचा कर्णधार बाबर आझम सध्या आपल्या तुफान फॉर्ममुळे चर्चेत आहे. त्याने टी-२० क्रिकेटचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलचा खेळ खल्लास केला आहे. गेलने केलेला विश्वविक्रम बाबर आझमने मोडीत काढला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात सर्वात वेगवान फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलला बाबरने मागे टाकले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सात हजार धावा पूर्ण करणारा तो जगातील सर्वात वेगवान फलंदाज बनला आहे. पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या नॅशनल टी-२० कप स्पर्धेत खेळताना त्याने हा पराक्रम केला आहे.

वाचा-पराभवानंतर भावूक झाला कर्णधार; हव तर ऑरेंज कॅप घ्या…

बाबर आझमने टी-२० क्रिकेटच्या १८७ व्या डावात सात हजार धावा करत ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडला. गेलने आपल्या टी-२० कारकिर्दीच्या १९२ व्या डावात हा पराक्रम केला. या यादीत भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने टी-२० क्रिकेटमध्ये २१२व्या डावात ७००० धावांचा टप्पा गाठला होता.

वाचा- पँडोरा पेपर: सचिन तेंडुलकरने खरच कर चुकवेगिरी केली का? मास्टर ब्लास्टरने दिले उत्तर

बाबर आझमने फक्त टी-२० मध्ये सर्वात जलद सात हजार धावा केल्या नाहीत, तर असा पराक्रम करणारा तो सर्वात तरुण फलंदाज देखील ठरला आहे. या प्रकरात त्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकचा विक्रम मोडला आहे. बाबरने हा पराक्रम २६ वर्ष ३५३ दिवसात केला, तर क्विंटन डी कॉकने २८ वर्ष २८५ दिवसात केला. विराट कोहली देखील या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने टी-२० मध्ये २८ वर्ष ३६४ दिवसात सात हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.

वाचा- Video: IPL मधील बेस्ट बॉल; चेंडू असा वळाला की फलंदाजासह सर्व झाले हैराण

जगातील सर्वात वेगवान सात हजार धावा पूर्ण करण्यापूर्वी बाबर आझमने सर्वात वेगवान तीन हजार, चार हजार आणि सहा हजार टी-२० धावा करणारा आशियाई फलंदाज ठरला आहे.

वाचा- आयपीएलIPL Playoffs: प्ले ऑफसाठीची चुरस कायम; चौथा संघ कोणता? या दिवशी ठरणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: