इशान किशनसारखंच कृणाल पंड्याला संघाबाहेर बसवण्याचं धाडसं रोहित शर्मा दाखवणार का, जाणून घ्या कामगिरी


नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा संघाला आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्माने फॉर्मात नसलेल्या इशान किशनला एका सामन्यासाठी संघाबाहेर काढले होते. पण हाच न्याय रोहित कृणाल आणि हार्दिक पंड्या यांना लावणार का, असा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे.

आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच सामने युएईमध्ये खेळले आहेत, या पाच सामन्यांमध्ये कृणाल पंड्याला फक्त ३४ धावाच करता आलेल्या आहेत. कृणालला आपली फलंदाजी दाखवण्यासाठी बरीच संधी मिळाली होती. पण एकाही सामन्यात कृणालला १३पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाही. त्यामुळे कृणाल हा एक फलंदाज म्हणून सातत्याने अपयशी ठरताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्येही कृणालकडून चांगली कामगिरी पाहायला मिळालेली नाही. कारण गेल्या पाच सामन्यांमध्ये कृणालने फक्त दोनच विकेट्स घेतलेल्या आहेत. त्यामुळे कृणाल पंड्या कोणत्या जीवावावर मुंबई इंडियन्सच्या संघात कायम राहू शकतो, हा प्रश्न आता चाहत्यांना पडलेला आहे. हीच गोष्ट कृणालचा भाऊ हार्दिकच्याबाबतही आहे. हार्दिक फिट नव्हता, त्यामुळे तो मुंबई इंडियन्सकडून काही सामने खेळू शकला नव्हता. पण हार्दिक खेळायला मैदानात उतरला तेव्हा त्याच्यातील मॅचविनर आतापर्यंत दिसलेला नाही. फलंदाजीमध्ये मोठी फटकेबाजी करण्याची हार्दिकला संधी होती, पण या संधीचे सोने त्याला करता आले नाही. त्याचबरोबर हार्दिक आहा गोलंदाजी करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. हार्दिक मुंबई इंडियन्सच्या संघात एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळत आहे. पण हार्दिक सध्या गोलंदाजी करत नाही, त्यामुळे तो फक्त फलंदाज म्हणून संघात आहे. पण हार्दिकने आपल्या फलंदाजाच्या भूमिकेला अजूनही न्याय दिलेला नाही. त्यामुळे फॉर्मात नसलेल्या इशान किशनला जसं संघाबाहेर करण्यात आलं होतं, तसंच हार्दिक आणि कृणाल यांना संघाबाहेर करण्याचं धाडस रोहित शर्मा दाखवणार का, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. इशानला वेगळा न्याय आणि पंड्या बंधूंना वेगळा, असे मुंबई इंडियन्सच्या संघात का घडतं आहे, हे कोडे अजूनही चाहत्यांना सुटलेले नाही.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: