पँडोरा पेपर: असे काय केले ज्यामुळे सचिनचे नाव समोर आले, जाणून घ्या सत्य


नवी दिल्ली: गुप्त आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीवर पँडोरा पेपरच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा करण्यात आल्याचा दावा केलाय. या पेपर्समध्ये ३०० भारतीयांची नावे समोर आली आहेत. ज्यात महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावाचा देखील समावेश आहे. इंटरनॅशनल कन्सोर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नलिस्ट (ICIJ) १.१९ कोटी हून अधिक कागदपत्रांची तपासणी केली आणि ज्यातून लक्षात आले की पनामा पेपल लीक झाल्यानंतर भारतीयांनी त्याची संपत्ती रीऑर्गनाईझ करण्यास सुरूवात केली. पाहूयात या पेपरमधून सचिन तेंडुलकर संदर्भात काय आरोप करण्यात आले आहेत.

वाचा- पँडोरा पेपर: सचिन तेंडुलकरने खरच कर चुकवेगिरी केली का? मास्टर ब्लास्टरने दिले उत्तर

पनामाचे पेपर जेव्हा लीक झाले त्यानंतर तीन महिन्यांनी सचिन तेंडुलकरने ब्रिटीश व्हर्जिन आयलंडमध्ये आपली संपत्ती विक्री करण्यामध्ये व्यस्त होता. जसे यांचे बिंग फुटले तसे या लोकांनी संपत्ती विक्री करुन आपले नावे लपवण्याचा प्रयत्न केला.

पँडोरा पेपरच्या तपासात हा खुलासा झाला आहे की सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि अंजलीचे वडील आनंद मेहता हे ब्रिटिश वर्जिन आयर्लंडमध्ये एका विदेशी संपत्तीचे लाभार्थी होते. या संपत्तीला २०१६ साली लिक्विडेट करण्यात आले आणि २६.८ लाख डॉलरच्या शेअरर्सला बायबॅक करण्यात आले.

वाचा- पराभवानंतर भावूक झाला कर्णधार; हव तर ऑरेंज कॅप घ्या…

पनामा लॉ फर्म एल्कोगलच्या रेकॉर्डनुसार सचिन, त्याची पत्नी अंजली आणि सासरे आनंद मेहता यांचे नाव ब्रिटिश वर्जिन आयर्लंड्स येथील सास इंडरनॅशनल लिमिडेट कंपनीत बीओ आणि संचालक म्हणून होते. पँडोरा पेपरनुसार सासचा पहिला संदर्भ २००७ सालचा आहे. या कंपनीच्या मालकांना झालेला आर्थिक लाभ याची कागदपत्रे जुलै २०१६ साली जेव्हा कंपनी लिक्विडेशन झाली तेव्हा उपलब्ध झाली. कंपनी जेव्हा लिक्विडेशन झाली तेव्हा शेअरधारकांनी खालील सूचीबद्ध किंमतीवर त्याचे शेअर्स परत खरेदी केले:

वाचा- Video: IPL मधील बेस्ट बॉल; चेंडू असा वळाला की फलंदाजासह सर्व झाले हैराण

सचिन तेंडुलकर- ९ शेअर- ८,५६,७०२ डॉलर
अंजली तेंडुलकर- १४ शेअर- १३,७५, ७१४ डॉलर
आनंद मेहता- ५ शेअर- ४,५४,०८२ डॉलर

अशा पद्धतीने सास इंटरनॅशनल लिमिडेटच्या शेअर्सचे सरासरी बायबॅक मुल्य जवळ जवळ ९६ हजार डॉलर इतके आहे. ज्या दिवशी ही कंपनी स्थापन झाली. तेव्हा कंपनीने ९० शेअर जारी केले होते. अंजली तेंडुलकरला ६० शेअर्सचे पहिले सर्टिफिकेट मिळाले होते. तर तिचे वडील आनंद यांना ३० शेअर्सचे दुसरे शेअर सर्टिफिकेट मिळाले होते. अन्य शेअर्सच्या बायबॅकचे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही.

सास इंटरनॅशनल लिमिडेट ही कंपनी ३१ ऑगस्ट २०१६ रोजी बंद करण्यात आली. कंपनी बंद करण्याच्या प्रस्तावावर सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर आणि आनंद मेहता यांची स्वाक्षरी आहे.

वाचा- IPL Playoffs: प्ले ऑफसाठीची चुरस कायम; चौथा संघ कोणता? या दिवशी ठरणार

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टमध्ये हे देखील म्हटले आहे की, सचिन तेंडुलकर फाउंडेशनचे सीईओ आणि संचालक मृणमय मुखर्जी यांनी म्हटले आहे की, सचिन तेंडुलकरद्वारे गुंतवणूक करण्यात आलेली सर्व रक्कम ही त्याच्या टॅक्स पेड फंड्समधून लिबरलाइज्ड रेमिटेंस स्कीममध्ये केली गेली आहे. हे सर्व नियमानुसार केले आहे. त्याचे टॅक्स रिटर्न जाहीर केले आहेत. सचिन तेंडुलकरचा मली लॉड्रिंग, कर चोरी किंवा अन्य अवैध प्रकरणात सहभागी होण्याचा प्रश्नच येत नाही. सचिनकडून करण्यात आलेली गुंतवणूक भारतीय बँकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे आणि आयकर अधिकाऱ्यांना त्याची पूर्ण माहिती आहे. संबंधिक कंपनी लिक्विडेशन झाल्यानंतर सचिनने मिळालेली रक्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: