jitesh antapurkar : देगलूर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी
कोण आहेत जितेश अंतापूरकर?
देगलूर-बिलोली हा विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातील आहे. या मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) रावसाहेब अंतापूरकर यांचं करोनाने निधन झालं. यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघाची ही पोटनिवडणूक होत आहे. जितेश अंतापूरकर हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र आहेत.
भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी?
शिवसेनेचे सुभाष साबणे हे अलिकडेच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहेत. सुभाष साबणे हे माजी आमदार आहेत. साबणे यांनी यापूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. यामुळे शिवसेना सोडून भाजपमध्ये आलेल्या सुभाष साबणे हे उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत आहेत. तसंच मुंबईत याबाबत भाजपची नुकतीच बैठक झाली. भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने सुभाष साबणे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
priyanka gandhi : प्रियांका गांधी नजरकैदेत, खोली झाडतानाचा व्हिडिओ व्हायरल; आमरण उपोषण सुरू
कधी होणार देगलूरची पोटनिवडणूक?
नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली या विधानसभेच्या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Deglur Vidhansabha Bypoll) येत्या ३० ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी ही ३ नोव्हेंबरला होणार आहे.