‘यूके’मध्ये दिवाळखोर अन् हजारो कोटी दडवले; ‘पॅंडोरा पेपर्स’मुळे अनिल अंबानींचा खरा चेहरा उघड


हायलाइट्स:

  • पँडोरा पेपर्स लीकमुळे भारतातच नव्हे तर जगभरात खळबळ उडाली आहे.
  • अनिल अंबानी यांच्यावर चिनी बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे.
  • यूकेमधील कोर्टाने अनिल अंबानी यांना दिवाळखोर जाहीर केले होते.

नवी दिल्ली : भारतीय आणि चीनी बँकांचीं कर्जे फेडण्यास असमर्थ असल्याचे भासवत दिवाळखोर बनलेल्या उद्योजक अनिल अंबानी यांचा खरा चेहरा पँडोरा पेपर्स लीकमधून उघड झाला आहे. यूकेमध्ये (ब्रिटन) दिवाळखोर बनलेल्या अनिल अंबानी यांच्या जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड आणि सायप्रस या देशांमध्ये १८ कंपन्या असून यात त्यांनी हजारो कोटी दडवले असल्याचे पँडोरा पेपर्स लीकमधून समोर आले आहे.

पॅंडोरा पेपर्स प्रकरण ; केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल, अर्थ मंत्रालयाने घेतला ‘हा’ निर्णय,
अनिल अंबानी यांच्यावर चिनी बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. न्यायालयीन लढाईसाठी वकिलाला देण्यासाठी पैसे नाहीत, असे अनिल अंबानी यांनी काही महिन्यांपूर्वी यूकेमधील न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार कोर्टाने अनिल अंबानी यांना दिवाळखोर जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात पँडोरा पेपर्स लीकमधून अनिल अंबानी यांनी कर चुकिवगिरीसाठी नंदनवन असलेल्या देशांमध्ये बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी दडवले असल्याची माहिती समोर आली आहे.

ऊर्जा क्षेत्रात अदानींची आगेकूच; तब्बल २६ हजार कोटी मोजून खरेदी केली ‘ही’ कंपनी
अनिल अंबानी यांच्या जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड आणि सायप्रस या देशांमध्ये १८ कंपन्या आहेत. या कंपन्या त्यांनी २००७ ते २०१० मध्ये सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी ७ कंपन्यांनी कर्ज घेऊन जवळपास १.३अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

तेजी परतली; सेन्सेक्सची ६०० अंकांची झेप, गुंतवणूकदारांची एक लाख कोटींची कमाई
अनिल अंबानी यांच्याशिवाय फरार हिरे व्यापारी आणि युकेमध्ये तुरुंगात असलेल्या नीरव मोदी याच्या बहिणेने देखील अशीच बनावट ट्रस्ट स्थापन करून पैसे हस्तांतर केले आहे. नीरव मोदी भारतातून पळून जाण्याच्या एक महिना आधी ही ट्रस्ट करण्यात आली असल्याचा दावा पँडोरा पेपर्सने केला आहे.

पँंडोरा पेपर्सनं उडवली जगभरात खळबळ; करचुकव्यांच्या यादीत सचिन तेंडुलकरसह ३०० भारतीय
उद्योजक गौतम अदानी यांच्या भावाने विनोद अदानी यांनी ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये तीन वर्षांपूर्वी कंपनी सुरु केली आहे. मात्र पँडोरा पेपर्स लिकमध्ये नाव आल्यानंतर ही कंपनी बंद केली असल्याचे विनोद अदानी यांनी म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: