महाविकास आघाडीला मोठा धक्का, काँग्रेसचा बंडखोर उमेदवार भाजपच्या मतांनी विजयी


हायलाइट्स:

  • महाविकास आघाडीला मोठा धक्का
  • काँग्रेसचा बंडखोर उमेदवार भाजपच्या मतांनी विजयी
  • नारायण राणे समर्थक शीतल आंगचेकर विजयी

सिंधुदुर्ग : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्येच फुटीचे नाट्य दिसले. गटनेते यांनी काढलेल्या व्हीपचा अनादर काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी केल्याने महाविकास आघाडीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचाच पराभव झाला. पर्यायाने भाजपच्या नगराध्यक्ष सहित काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांनी मतदान केल्याने काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार नारायण राणे समर्थक शीतल आगचेकर या १० मतांनी विजयी झाल्या.

आता महाविकास आघाडीचे गटनेते प्रकाश डिचोलकर यांनी बजावलेल्या व्हीपचा अनादर उपनगराध्यक्ष उमेदवार सहित तीन नगरसेवक यांनी केल्याने त्याच्यावर कारवाई वरिष्ठ करणार असल्याचे गटनेते यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नारायण राणे समर्थक उमेदवार शीतल आगचेकर विजयी झाल्याने जिल्ह्यात नारायण राणेंचेच वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले.

धक्कादायक! २ अल्पवयीन बहिणींवर सतत सुरू होते बलात्कार, नवी मुंबईतून जालन्यात पोहचल्या अन्…
वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये सत्ताधारी भाजपची सत्ता आहे नगराध्यक्ष भाजपचे असून एकूण १७ नगरसेवक्त, भाजप ७, काँग्रेस ७, शिवसेना २, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे यापूर्वी राज्यात भाजप शिवसेना आघाडी असल्याने शिवसेनेच्या अस्मिता राऊळ उपनगराध्यक्ष होत्या त्यांनी राजीनामा दिल्याने आज विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्राताधिकारी प्रशांत पानवेकर याच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

भाजपकडून साक्षी पेडणेकर तर काँग्रेसकडून विधाता सावत व शीतल आगचेकर यांनी उमेदवारी भरली भाजप उमेदवार साक्षी पेडणेकर यांनी माघार घेतली त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विधाता सावत याना ७ तर शीतल आगचेकर याना १० मते मिळाली एक तटस्थ राहिला मतदान हात उंचावून झाले. राज्यात महाविकास आघाडी असतानाही व्हीपचा अनादर काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी केल्याने महाविकास आघाडी उमेदवाराचा प्रभाव झाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: