‘माझ्यावरील कारवाई समजू शकतो, पण बहिणींच्या कंपन्यांवर छापे का?’


हायलाइट्स:

  • अजित पवारांशी संबंधित मालमत्तांवर इन्कम टॅक्स विभागाचे छापे
  • छापे पडल्याचं अजित पवारांनी केलं मान्य
  • बहिणींच्या कंपन्यांवर झालेल्या कारवाईचं अजित पवारांना आश्चर्य

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने व कंपन्यांवर इन्कम टॅक्स विभागाच्या पथकानं छापे टाकले आहेत. खुद्द अजित पवार यांनी असे छापे पडल्याचं मान्य केलं आहे. इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांकडून काही ठिकाणी अजूनही झाडाझडती सुरूच आहे. (Ajit Pawar on Income Tax Raids on his Property)

छापे पडल्याची माहिती खरी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ‘आयटीनं कुठे छापे टाकावेत हा त्यांचा अधिकार आहे. काही शंका असल्यास ते छापे टाकू शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो. अर्थमंत्री असल्यानं आर्थिक शिस्त कशी राखायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे. माझ्या कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळी भरला जातो. त्यामुळं हे छापे राजकीय हेतूनं टाकले की इन्कम टॅक्सलाच खरोखरच काही तपास करायचा होता हे माहीत नाही,’ असं अजित पवार यांनी सांगितलं.

वाचा: शेतकरी वाऱ्यावर पडलाय का? मोगलाई आहे का?; अजित पवार भडकले!

अजित पवार यांच्या बहिणींच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले आहेत. त्याबद्दल मात्र त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकल्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण ज्यांची ३५-४० वर्षापूर्वी लग्नं झाली. ज्यांचे संसार चांगल्या पद्धतीनं सुरू आहेत, त्या माझ्या तीन बहिणींशी संबंधित कंपन्या आणि कार्यालयावरही छापे टाकण्यात आले आहेत. कोल्हापूर आणि पुण्यात हे छापे टाकण्यात आले आहेत. त्याचं कारण मला माहिती नाही. पण मला त्याचं दु:ख आहे. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून हे छापे टाकले गेले असतील तर राज्यातील जनतेनं याचा जरूर विचार करावा. इतक्या खालच्या थराला जाऊन कुणी राजकारण करू शकेल असं वाटलं नव्हतं. शेवटी जनता सर्वस्व असते. कोणत्या थराला जाऊन या संस्थांचा वापर केला जातोय हे लोकांनी लक्षात घ्यावं.’ असं अजित पवार म्हणाले.

वाचा: झेडपी निकालावर अजित पवार म्हणाले, फार आनंदी नाही, फार दु:खी नाही!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: