मी राजीनामा देतोय, टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघासोबत असणार नाही


नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठी घोषणा केली होती. विराटने आगामी वर्ल्डकपनंतर टी-२० संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे जाहिर केले होते. आता भारतीय संघातील आणखी एका सदस्याने राजीनाम्याची घोषणा केली आहे.

वाचा-मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी; प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठीचे ठरले नवे समीकरण

युएईत १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचे मुख्य स्ट्रेथ आणि कंडीशनिक कोच निक वेब यांनी मोठी घोषणा केली आहे. वेब यांनी सांगितले की ते टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघासोबत असणार नाहीत. टीम इंडियाचे फिटनेस कोच असलेले निक वेब या मोठ्या स्पर्धेनंतर राजीनामा देणार आहेत. निक वेब यांनी इस्टाग्रामवर भारतीय संघातील काही खेळाडूंसह फोटो शेअर केला आहे. या फोटो पोस्टमध्ये त्यांनी राजीनाम्याबद्दल सांगितले.

वाचा-सनरायझर्सने RCBला दिला पराभवाचा धक्का; सामना गमवून विराटच्या संघाने केली मोठी चूक

मला गेल्या २ पेक्षा अधिक वर्षापासून भारत आणि भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या काळात एक संघ म्हणून आम्ही बरच काही मिळवले आहे. एक संघ म्हणून आम्ही इतिहास घडवला. आम्ही विजय मिळवले, आमचा पराभव झाला. पण आम्ही प्रत्येक दिवशी सातत्याने आव्हानांचा सामना केला, असे निक वेब यांनी म्हटले.

वाचा- हर्षल पटेलने केली कमाल; बुमराहचा विक्रम मोडला आणि झाला नंबर वन

वाचा- कोलकाता विरुद्ध राजस्थान; मुंबई इंडियन्स आव्हान ठरवणारी लढत

मी काही दिवसांपूर्वी बीसीसीआयला विनंती केली आहे की टी-२० वर्ल्डकपनंतर माझा करार पुढे वाढवू नये. हा एक सोपा निर्णय नव्हता. पण शेवटी मला कुटुंबाची काळजी घ्याची आहे. न्यूझीलंडच्या नागरिकांना सध्या करोनामुळे देशात जाण्यात अनेक बंधणे घातली आहेत. भविष्यात यात काही सवलत मिळू शकते. भविष्य काय असेल मला माहिती नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की भारताच्या संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकाला यासाठी मी सर्व प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: