शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; ‘या’ दोन पत्रकारांचा गौरव


ओस्लो: यंदाच्या वर्षाचा शांततेचा नोबेल पुरस्कार (Nobel Peace Prize 2021) जाहीर करण्यात आला आहे. यंदा दोन पत्रकारांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला असल्याची घोषणा नोबेल पुरस्कार समितीने केली आहे. फिलीपाइन्सनमधील मारिया रेस्सा (Maria Ressa) आणि रशियातील दिमित्री मुरातोव्ह (Dmitry Muratov) या दोन पत्रकारांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.नोबेल २०२१: साहित्यातील नोबेल विजेते अब्दुलरझाक गुरनाह आहेत तरी कोण?

नोबेल समितीने म्हटले की, स्वतंत्रता, मुक्त आणि तथ्यांवर आधारित पत्रकारिता ही सत्तेचा दुरुपयोग, असत्य आणि युद्ध दुष्प्रचारापासून संरक्षण करते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहितीचे स्वातंत्र्य हे लोकांना जागरुक करते. हे अधिकार लोकशाहीची पूर्वअट आहे. तसेच युद्ध परिस्थिती आणि संघर्षात संरक्षण करते. मारिया आणि दिमित्री यांना हा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित करत आहे.

Explainer रेणू निर्माण करणाऱ्या यंत्राला का मिळाला यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार

फिलीपाइन्सच्या राष्ट्रपतींची प्रखर टीकाकर म्हणून मारिया रेस्सा यांची ओळख आहे. त्यांना याआधीदेखील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना एका प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या निर्णयाला माध्यम स्वातंत्र्यावरील मोठा हल्ला समजण्यात आला. मनिलातील कोर्टाने वृत्तसंकेतस्थळ रॅपलर इंकच्या मारिया रेस्सा आणि माजी वार्ताहर रेनाल्डो सँटोंस ज्युनिअर यांना एका श्रीमंत उद्योजकाची बदनामी केल्या प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली होती.

तर, रशियन पत्रकार दिमित्री मुरातोव्ह यांनी कायम अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने भूमिका घेतली आहे. रशियन वृत्तपत्र नोवाया गजेटाचे ते संपादक आहेत. पुतीन यांच्या सत्ता काळात त्यांच्या वृत्तपत्राने कायम सरकारविरोधी भूमिका घेतली असल्याचे म्हटले जाते.

हवामानाचे कोडे उलगडण्यासाठी भौतिकशास्त्राचे नोबेल; जाणून घ्या संशोधनाविषयी
मागील वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार हा संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला जाहीर करण्यात आला होता. युद्ध-संघर्षग्रस्त भागातील शांततेसाठी परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या या वर्ल्ड फूड प्रोग्रामने मोलाची कामगिरी बजावली असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले होते. अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेनंतर १९६३ मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी जगभरातील विविध देशांमधून निधी दिला जातो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: