पुण्यात मिरवणुकीत हाय टेंशन वायरला ध्वजाचा रॉड लागून विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

[ad_1]

current
पुण्यात पैगंबर मोहम्मद जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ध्वज फडकवताना धवजाचा लोखंडी रॉड हाय टेन्शन वायरला लागून विजेच्या धक्क्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले.या घटनेनन्तर मिरवणूक रद्द केली.अभय वाघमारे 17 वर्ष आणि जकेरिया शेख  20 वर्ष अशी मृत तरुणांची नावे आहेत.

 

सदर घटना रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.वडगाव शेरी भाजी मार्केट परिसरात पैगंबर मोहम्मद जयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली.ट्रॅक्टरवर अभय, झकेरिया आणि त्यांचे काही मित्र बसले होते. 

निवणुकीत ध्वजा फडकवताना ध्वजेची लोखंडी रॉड वरून जाणाऱ्या हायटेंशन वायरला आदळली.

विजेचा प्रवाह रॉड मध्ये झाला आणि अभयला शॉक लागला त्याला वाचवण्यासाठी झकारिया  धावत गेला आणि त्याला पण विजेचा धक्का लागला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅक्टरवर बसलेले तिघे भाजले. या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.  

Edited By – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top