ऑक्सिजन प्रकल्पाची लवकरच यशस्वी चाचणी करणार – चेअरमन अभिजीत पाटील

ऑक्सिजन प्रकल्पाची लवकरच यशस्वी चाचणी करणार – चेअरमन अभिजीत पाटील Oxygen pilot project to be successfully tested soon – Chairman Abhijeet Patil
उस्मानाबाद पालकमंत्री यांनी धाराशिव कारखान्याच्या पायलट ऑक्सिजन प्रकल्पाची केली पाहणी
  उस्मानाबाद,प्रतिनिधी - सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अनेक कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने साखर कारखान्यामध्ये प्रथमच ऑक्सिजनची निर्मिती करणार असलेल्या धाराशिव साखर कारखान्यावर उस्मानाबादचे पालकमंत्री ना.शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अंतिम टप्प्यात असलेल्या कामाची पाहणी केली. 

   याभेटी दरम्यान ऑक्सिजन प्रकल्पासंदर्भात श्री.गडाख यांनी संपूर्ण माहीती घेऊन चाचणी लवकरात लवकर कार्यान्वित करण्यास सांगितले. 

वाढत्या ऑक्सिजनच्या मागणीनुसार सगळ्याचे लक्ष धाराशिव साखर कारखान्याच्या पायलट प्रकल्पाकडं लागले असून लवकरच यशस्वी  चाचणी करणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन आणि डिव्हिपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगितले. 

     यावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवळे ,निवासी उप जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उपविभागीय अधिकारी कळंब डॉ.श्रीमती अहिल्या गाठाळ,अन्न व औषध प्रशासन अधिकारी , तहसिलदार रोहन शिंदे,मंडल अधिकारी देवानंद कांबळे, कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, दिपक आदमिले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: