उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिवसैनिकांसोबत आढावा बैठक; एकजुटीने प्रचार करण्यासाठी विविध विषयांवर झाली चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत आढावा बैठक; एकजुटीने प्रचार करण्यासाठी विविध विषयांवर झाली सकारात्मक चर्चा

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांचा सहभाग

पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ एप्रिल २०२४: आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चेद्वारे प्रचाराचा आढावा घेतला.

या बैठकीला शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह माजी आमदार शरद सोनवणे, सुधीर कुरुमकर, बाळासाहेब चांदेरे, सुधीर जेव्हरे, पूजा रावेतकर, सारिका पवार, निलेश गिरमे आदींसह शिवसैनिक,पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बारामती, शिरूर, मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्नांचे निरसन केले. जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येण्यासाठी सर्व शिवसैनिक एकजुटीने प्रचारात सहभागी होतील आणि महायुतीच्या उमेदवाराचे काम करतील अशी ग्वाही शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली.

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रचारावेळी शिवसेना महिला आघाडीला देखील सामावून घ्यावे.लवकरच शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिला मेळावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच ज्या भागात ज्या पक्षाची ताकद आहे त्या भागात त्या पक्षाकडे संयोजन द्यावे अशा सूचनाही शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *