युटोपियन शुगर्सचे चालू गळीत हंगामाकरिता ६.५० लाख मे.टनापेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट – उमेश परिचारक

युटोपियन शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न
चेअरमन उमेश परिचारक आणि रोहन परिचारक

मंगळवेढा/ प्रतिनिधी :- कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या २०२१-२०२२ या आठव्या गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन समारंभ रविवार दि.१०/१०/२०२१ रोजी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक आणि रोहन परिचारक यांच्या हस्ते अत्यंत साधेपणाने पण उत्साहात संपन्न झाले.

रोहन प्रशांत परिचारक
प्रारंभी कारखान्याचे सिव्हिल इंजिनियर अनिल भोसले यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.

   यावेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,आपल्या कारखान्याच्या हा आठवा गळीत हंगाम असून मागील सात ही हंगामात युटोपियन शुगरने भरीव कामगिरी केली आहे.चालू गळीत हंगामात ६.५० लाख मे.टन ऊसाचे क्रसिंग करून ऊसाच्या रसापासुन व बी हेवी मोलॅसेस पासून १.५० कोटी लिटर इथेनॉल उत्पादित करणार आहे. चालू गळीत हंगामात ऊसाची उपलब्धता चांगली असून सर्व ऊस उत्पादक हे नियोजित नोंदणी प्रोग्रॅम नुसारच कारखान्यास ऊस देतील अशी मला खात्री आहे. 

    या गळीत हंगामात कारखान्याचे मार्गदर्शक आमदार प्रशांत परिचारक यांच्या सुचनेनुसार पंढरपूर-मंगळवेढा व मोहोळ या तालुक्यातील इतर कारखान्याच्या सभासदांचा संपूर्ण ऊस गाळप केला जाईल.त्यामुळे ऊस उत्पादकांनी चिंता न करता कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही परिचारक यांनी केले. कारखान्याने या वर्षी २०० ट्रॅक्टर,१५० मिनी ट्रॅक्टर,व 20 बैलगाडी या प्रमाणे करार केले असून ही सर्व वाहने व तोडणी कामगार येत्या १५ ते१६ तारखेपर्यंत कार्यक्षेत्रामध्ये पोहोचतील याची खबरदारी कारखान्याने घेतली आहे.

   संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना यंत्रणा सज्ज आहे. लवकरच मोळी पूजन करून गळीत हंगामास सुरुवात होईल.नवरात्री निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व कामगार हा चालू गळीत हंगाम यशस्वी करतील असा विश्वास उमेश परिचारक यांनी व्यक्त केला . कारखान्याच्या व्यवस्थापनामध्ये पुढील काळात रोहन प्रशांत परिचारक(B.E. Mech.,MBA Londan) हे मदत करतील अशी अपेक्षा उमेश परिचारक यांनी व्यक्त केली. त्यावेळी उपस्थितांनी या घोषणेचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

याप्रसंगी रोहन परिचारक,प्रगतशील बागायतदार महादेव लवटे,सुरेश टिकोरे,कारखान्याचे सर्व खाते प्रमुख,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: