पुणे मेट्रोच्या १०व्या वर्धापन दिनी रामचंद्र शिंदे यांना उत्कृष्ट परफॉर्मन्स अवॉर्ड : लँड टीमच्या कार्याचा गौरव
Joint General Manager (Land) रामचंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लँड टीमचे यश: 2025 साठी सन्मान
पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या १० व्या वर्धापन दिनी Joint General Manager (Land) रामचंद्र शिंदे यांना 2025 या वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कृष्ट परफॉर्मन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा सन्मान संपूर्ण लँड टीमच्या संघभावनेचे प्रतीक आहे.
Pune metro rail news : पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २३ जानेवारी :पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन प्रकल्पाच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. 23/01/2025 रोजी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी Joint General Manager (Land) रामचंद्र शिंदे यांना 2025 या वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कृष्ट परफॉर्मन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार पुणे मेट्रो लँड विभागाच्या (Land Team) सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि समन्वयपूर्ण कार्याची पोचपावती असून, हा सन्मान वैयक्तिक नसून संपूर्ण लँड टीमच्या एकत्रित प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना रामचंद्र शिंदे यांनी व्यक्त केली.

लँड टीमच्या संघभावनेला सलाम
मेट्रो प्रकल्पासाठी जमीन संपादन, विविध शासकीय प्रक्रिया, नागरिकांशी समन्वय तसेच अडचणींवर मात करत वेळेत काम पूर्ण करण्यात लँड टीमने मोलाची भूमिका बजावली आहे. या यशामागे प्रत्येक सहकाऱ्याचे योगदान महत्त्वाचे असल्याचे रामचंद्र शिंदे यांनी नमूद केले.
पुरस्कार स्वीकारताना त्यांनी,This is land my team effort and teamwork. हे award land team चे आहे.Thanks to all my land team. Again thanks to all अशी भावना व्यक्त करून संपूर्ण टीमचे आभार मानले.

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी महत्त्वाचे योगदान
पुणे मेट्रोचा दहा वर्षांचा प्रवास अनेक आव्हानांनी भरलेला असला तरी विविध विभागांच्या समन्वयातून प्रकल्प यशस्वीपणे पुढे जात आहे. त्यामध्ये Joint General Manager (Land) रामचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लँड टीमचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
हा पुरस्कार भविष्यातही अधिक जबाबदारीने,पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

