पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरीने सोनसाखळी चोरणा-या दोन चोरांकडून अंदाजे १२ लाख १० हजार किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०९/२०२४- शहर व ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.पोलिस आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.अशीच एक घटना नुकतीच घडली होती.सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीणचे प्रितम यावलकर यांच्या सुचने प्रमाणे सोलापुर जिल्ह्यातील जबरी चोरीस प्रतिबंध करणेच्या आदेशान्वये पंढरपुर विभाग पोलीस उपअधिक्षक डॉ अर्जुन भोसले पंढरपुर व पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुरनं ५२५/२०२४ बीएनएस ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दि.२८/०८/२०२४ रोजी फिर्यादी डॉ.सौ.मैत्रेयी मंदार केसकर वय ४५ वर्षे रा.शाकुंतल नगर, इसबावी पंढरपूर यांच्या अंगावर चटणी टाकुन त्यांना ढकलुन देवून गळ्यातील ४४.६६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे गंठण काळे मनी व सोन्याच्या वाटी असलेले बळजबरीने हिसकावुन तोडून जबरी चोरी करून तेथुन दोन अज्ञात इसम मोटारसायकल वरून निघुन गेले आहेत म्हणुन अज्ञात इसमांविरुध्द पंढरपुर शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचारी यांचे दोन पथक तयार करून पेट्रोलिंग करण्याकरीता रवाना केली व ट्रॅफिक कर्मचार्यांना नाकाबंदी करून अज्ञात मोटारसायकल वरील आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या.
अज्ञात आरोपीचा व मोटार सायकलचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी स्टेशन रोड ते टाकळी रोड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दोन संशयीत इसम मोटारसायकल वरून जात असताना दिसले.त्यांना मोटार सायकल थांबविण्यास सांगितले असता ते मोटारसायकल वरून पळून जात असताना पडले.त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणल्यानंतर दोन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी नामे विनोद गोविंद पिंपळे रा.उजनी कॉलनी, श्रीपुर ता.माळशिरस याचे जर्कीनमध्ये गुन्ह्यातील गेलेला माल ३,३१,०२६/-रू.चे एक ४४. ६६० ग्रॅम वजनाचे फिर्यादीचे सोन्याचे मोठे गंठण काळे मणी व सोन्याच्या वाटी, अर्धी अंबारी कंपनीची लाल चटणीची पुडी मिळून आली.आरोपी नामे महादेव शंकर पवार रा.श्रीपुर ता.माळशिरस जि. सोलापूर यांनी गुन्हा करताना वापरलेली होन्डा कंपनीची युनीकॉर्न मॉडेलची बिनानंबर असलेली मोटार सायकल असा मुद्देमाल त्यांचेकडे मिळाल्याने गुन्ह्याचे तपासकामी जप्त केला असून त्यांना अटक केल्यानंतर त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत ४ गुन्हे केले असल्याची कबुली दिल्याने त्या ४ गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
१) गुरनं ४१८/२०२४ भा.द.वि.स. ३९२,३४ प्रमाणे२) गुरनं १८/२०२४ भा.द.वि.सं.३९२, ३४ प्रमाणे३) गुरनं ८६४/२०२२ भा. द. वि.सं. कलम ३९२,३४ प्रमाणे वरील दाखल असलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ.अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अशिष कांबळे, स.पो.फौ.राजेश गोसावी, स.पो.फौ.नागनाथ कदम, पो.ह. बिपीनचंद्र ढेरे,पो.ह.सुरज हेंबाडे,पो.ह.शरद कदम, पो.ह. सिरमा गोडसे,पो.ह.नितीन पलुसकर, पो.ह.सचिन हेंबाडे, पो.ह.नवनाथ माने, पो.शि.शहाजी मंडले, पो.शि.समाधान माने, पो.कॉ.बजरंग बिचुकले,पो.कॉ.निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पो.शि.योगेश नरळे यांनी केली आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.