परिवर्तन महाशक्तीला मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील विविध ४२ पक्ष व सामाजिक संघटनांनी दिला पाठिंबा
छत्रपती संभाजीनगर/ज्ञानप्रवाह न्यूज- परिवर्तन महाशक्तीच्या सहभागी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील अश्वरुढ मुर्तीस अभिवादन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
परिवर्तन महाशक्ती ला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून आजच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध ४२ पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
या मेळाव्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू ,स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, स्वतंत्र भारत पक्षाचे मा.आमदार वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समिती प्रमुख मा.आमदार शंकरअण्णा धोंडगे, भारतीय जवान किसान पक्ष, जय विदर्भ पार्टी, महाराष्ट्र विकास पक्ष सहभागी होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.