पंढरीत दिवाळीची खरेदी एकाच छताखाली
दिवाळीनिमित्त मनसे आणि वीरशैव महिला मंडळ यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०९/२०२४- महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील महिला उद्योजकांसाठी पंढरपूरमध्ये भव्य एक्सपो घेऊन दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता यावी या हेतूने दिवाळीनिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम येथील टिळक स्मारक मैदानावर दि.१९,२० ऑक्टोबर २०२४ रोजी भरवण्यात येणार आहे.
यामध्ये भाग घेणाऱ्या महिला उद्योजकांसाठी मोफत स्टॉल व स्टॉल उभारण्यासाठी विना व्याज कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी स्टॉलची बुकिंग करावी असे आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे आणि डॉ.शोभा कराळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी मनसेचे पदाधिकारी व आद्य वीरशैव महिला मंडळाचे अध्यक्ष डॉ.सौ.शोभा कराळे,सौ.सुवर्णा स्वामी, सौ.आरती पावले, सौ.कविता पावले,सौ. विशालाक्षी पावले, सौ.संजीवनी ठिगळे, सौ.मनीषा वासकर, सौ.अनुराधा स्वामी आदी उपस्थित होत्या.
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि नागरिकांना दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता यावी या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आद्य वीरशैव महिला मंडळाच्या वतीने पंढरपुरात प्रथमच दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता येणार आहे. या एक्सपो मध्ये २०० स्टॉल उभारण्यात येणार असून यामध्ये भाग घेणाऱ्या महिलांना नाममात्र नोंदणी फी १०१ ठेवण्यात आली आहे.
भाग घेणाऱ्या महिला भगिनींना मोफत सुसज्ज स्टॉल दिले जाणार आहेत.
तसेच महिलांना २५ हजार रुपये स्टॉल उभारण्यासाठी कर्ज स्वरूपात देण्यात येणार आहे. हे कर्ज एक्सपो संपल्यानंतर भरावे लागणार आहे. याला कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. यामध्ये भाग घेणाऱ्या महिलांना नाव नोंदणी ५ ऑक्टोबर पर्यंत करता येणार आहे. प्रथम येणाऱ्या महिलांना यामध्ये संधी दिली जाणार आहे. दिवाळीनिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम मनसेच्या वतीने येथील टिळक स्मारक मैदानावर घेण्यात आला आहे. तरी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील महिलांनी भाग घ्यावा असे आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष संतोष कवडे, शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, मार्गदर्शक संदीप रणवरे, महेश पवार, ओंकार जाधव, शशिकांत पाटील, समाजसेवक बाबा चव्हाण आदी उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.