मुलगी ओझे नाही तर लक्ष्मी आहे तिचा सन्मान केला पाहिजे – डॉ नीलमताई गोऱ्हे
स्त्रियांचा सन्मान म्हणजे स्त्रियांचा अधिकार
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०९/२०२४- शिवसेनेच्या विजय संवाद यात्रेत शिवसेना नेत्या डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी व राज्यात लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजने संदर्भात पुणे राजगुरूनगर येथे संवाद साधला.
लाडकी बहीण सन्मान योजनेतील लाभार्थी आपला आनंद विधान परिषद उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्याकडे व्यक्त केला. या योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतून बहिणींनी दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी केल्या तर काही महिलांनी आपल्या व्यवसायास या निधीचा मोठा हातभार लागल्याचे सांगितले.
आनंदाचा शिधा,लाडकी बहीण सन्मान योजना, वयोश्री योजना तसेच वयोवृद्ध व्यक्तींसाठी तीर्थक्षेत्र पर्यंटन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात यशस्वीपणे राबवल्या आहेत.
भविष्यातही यासारख्या अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी आपणास धनुष्य बाणावर उभ्या असलेल्या उमेदवारांना निवडून आणायचे आहे असे सांगितले.स्त्रियांचा सन्मान हाच स्त्रियांचा अधिकार मुलगी ओझे नाही तर लक्ष्मी आहे तिचा सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादनही डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी केले.
महिलांना आत्मसन्मान व सुरक्षितेसाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे कारण आता तुम्ही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहेत यामुळे अधिक सशक्त झाल्या आहेत असे मत लाडकी बहीण सन्मान योजनेत संवाद करताना काढले.
शिवसेना पदाधिकारी सारिका पवार ,मनिषा पलांडे,पुजा राक्षे, सुदर्शना त्रिगुणाईत, शैला पाचपुते, शेतकरी नेते गणेश सांडभोर आदी उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.