फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप आणि शस्त्रक्रिया शिबीर आयोजन
माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर – युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर
या शिबिराचा लाभ फलटण शहरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांनी केले
फलटण/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ – फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत नेत्र तपासणी , मोफत चष्मा वाटप आणि मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने करण्यात आले असल्याची माहिती युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर यांनी दिली.
वाढत्या डोळ्यांच्या आजाराबाबत सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळावा, आवश्यक नेत्र तपासणी व्हावी या उदात्त उद्देशातून फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने फलटण शहरातील १२ प्रभागात मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात नेत्र तपासणीनंतर आवश्यक असणाऱ्या रुग्णांना मोफत औषधोपचार, मोफत चष्मा वाटप, शस्त्रक्रिया आवश्यक असल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.या शिबिराचा लाभ फलटण शहरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येते.व्यसनमुक्ती, स्वछता अभियान, महिला सक्षमीकरण, रोजगार मेळावे आदी उपक्रमांसह आता भव्य अशा मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.