माणूस शोधतो मी……
माणूस शोधतो मी……
कोलाहलात या माणसांच्या
शोधूनही भेटत नाही माणूस येथे
जो तो स्वार्थासाठी रंग बदलतो
सरडाही लाजतो कोणास चाड येथे !!१!!
भेटतात येथे गोड बोलून
केसाने गळा कापणारे सारे दलाल येथे
अपवाद येथे सर्जनशीलतेचा
कोणास सुतक येथे!!२!!
नेता साधू संत महंत इतुकेच काय
देवही जातीत कैद येथे
आरक्षणाचा राजकीय
ज्वालामुखी जाईल तिथे उद्रेक येथे!!३!!
निवडणूक लोकशाही मतांचा बाजार
कोण कोणास जबाबदार येथे
पैसा जात धर्म दहशत हीच
विजयाची हत्यारे येथे !!४!!
पुराव्यावर आधारित न्याय सत्याचा पंचनामा येथे
मतांची खरेदी विक्री गरिबीचा लिलाव येथे !!५!!
आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००

सुप्रभात
“मन संतुलीत असेल तरच संयम,विवेक ,विनय समन्वय शांती अन समाधान प्राप्त होते “!