भाजपाने केला जाहीरनामा प्रसिद्ध त्यात दिली ही आश्वासने
नवी दिल्ली – भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे .त्यात पुढील घोषणा जाहीर करण्यात आल्या आहेत.
मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.
गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक समाधानकारक आणि परवडणारे असेल.
७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल.
७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय, ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार.
मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.
गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधणार.
मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यं वाढवणार
तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार.
गुंतवणुकीद्वारे जीवनमान, जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्यांवर लक्ष देण्याचा प्रयत्न.
घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविणार.
पीएम किसान योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार.
सहकारातून समृद्धीच्या दृष्टीकोनातून भाजपा राष्ट्रीय सहकार धोरण आणणार.
देशभरातील दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्याही वाढवण्यात येणार.
पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.
जेनेरिक औषधांची केंद्र आणखी वाढवण्यात येणार.
उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षांपर्यंत वाढविण्यात येणार.
महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार.
कोट्यवधी लोकांची वीजबील शून्य करण्यावर भर देण्यात येणार.
कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार.
महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार.
३ कोटी महिलांना लखपती करणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवणार.
मुद्रा योजना १० लाखांवरून २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल.
भाजपाने या घोषणा केल्या असल्या तरी मतदार मात्र काही प्रमाणात नाराज आहे.वाढती महागाई, वाढलेले इंधन दर,भ्रष्टाचार काही प्रमाणात कमी झाला आहे असे दिसत असले तरी प्रत्यक्षात यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.भ्रष्टाचारांचे आरोप झालेले नेते ज्यांच्या विरोधात चौकशी करण्यात आली होती तेच नेते सामिल होत असल्याने पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे.मतदार भाजपा प्रेम करतो आहे परंतु ज्या गोष्टींसाठी विरोधी पक्षाला हरवून सत्ता मिळवून दिली त्याच गोष्टी घडत असल्याने मतदार नाराज झाले आहेत.या गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------