भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात मोठा बदल, आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूला संधी…


शारजा : भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या खेळाडूची आता भारतीय संघात एंट्री होणार असल्याचे समोर आले आहे.

भारताच्या ट्वेन्टी-२० संघात आता एक बदल करण्यात आला आहे. कारण आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला आता बीसीसीायने स्पर्धा संपल्यावरही युएईमध्येच राहण्यास सांगितले आहे. कारण आता दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज अवेश खानचा भारतीय संघात समावेश करण्यात येणार आहे. अवेश खान हा भारतीय संघाबरोबर नेट बॉलर म्हणून असेल. यापूर्वी आयपीएलमध्ये वेगवान चेंडू टाकणाऱ्या उमरान मलिकला भारतीय संघात नेट बॉलर म्हणून स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी यावेळी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ” निवड समितीने आता अवेश खानची नेट बॉलर म्हणून निवड केली आहे. पण जर भारतीय संघाला वाटले तर त्याला मुख्य संघातही खेळवले जाऊ शकते. त्यामुळे अवेश खान आता आयपीएल संपल्यावरही युएईमध्ये राहणार असून तो भारतीय संघाचा एक भाग असेल.”

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात आता बदल करण्याची तारीख आयसीसीने वाढवलेली आहे. आता १५ आक्टोबरपर्यंंत सर्व संघांना आपल्या संघात बदल करता येणार आहे. त्यामुळे आता याबाबतची अधिकृत माहिती बीसीसीआय १५ ऑक्टोबरला जाहीर करू शकते. त्यापूर्वी ज्या खेळाडूंना संधी द्यायची आहे, त्यांचा फिटनेस आणि कामगिरी पाहिली जाईल आणइ त्यानंतरच त्यांना युएईमध्ये आयपीएलनंतरही राहण्यास सांगितलं जाईल. त्यामुळे बीसीसीआयची निवड समिती आता विश्वचषकाच्या संघबांधणीसाठी पुढे सरसावलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत निवड समिती आपला संपूर्ण संघ तयार करून बीसीसीआयकडे खेळाडूंची यादी पाठवेल आणि त्यानंतर बीसीसीआय ती यादी जाहीर करेल. त्यामुळे आता भारताच्या विश्वचषकाच्या संघात अजून कोणत्या खेळाडूंचा समावेश करण्यात येऊ शकतो, याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. पण त्यासाठी चाहत्यांना आता १५ ऑक्टोबरपर्यंतची वाट पाहावी लागेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: