jem commander terrorist sham sofi killed : जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर सोफी याचा खात्मा, काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश


श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर शम सोफी याचा चकमकीत खात्मा करण्यात आला. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी ही माहिती दिली. अवंतीपोराच्या त्राल भागातील तिलवानी मोहल्लात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी आधी दिली होती.

गेल्या दोन दिवसांत सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. सोमवारी आणि मंगळवारी शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी कारवाईत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. सीआरपीएफची १७८ वी बटालियन, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू -काश्मीर पोलिसांनी शोपियान जिल्ह्यातील तुलरान आणि फेरीपोरा भागात या संयुक्तरित्या मोहीम राबवली होती.

Poonch Terror Attack: पूँछ हल्ल्यातील शहीद जवानाच्या पार्थिवाला मुख्यमंत्र्यांनी दिला खांदा

शोपियानमध्ये तुलरान परिसरात चकमक झाली. यात लश्करच्या टीआरएफ संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले. यातील एका दहशतवाद्याची ओळख पटलीय. मुख्तार शाह असं त्याचं नाव होतं. हा गंदरबालचा रहिवासी होता आणि तो श्रीनगरमधील एक विक्रेता वीरेंद्र पासवानच्या याच्या हत्येत सहभागी होता. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून शोपियानमध्ये आला होता. याशिवाय दुसरी चकमक शोपियानच्या फेरीपोरा भागात झाली. इथे चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. गेल्या ३६ तासांत सुरक्षा दलांनी एकूण ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला.

poonch encounter : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, ५ जवान शहीदSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: