पं.शौनक अभिषेकी, चि.अभेद अभिषेकी यांचा नवरात्री संगीत महोत्सवात रुक्मिणी मातेच्या चरणी स्वराभिषेक
अभिषेकी परिवाराकडून नवरात्रीतील अखंड २४ वी ही गायन सेवा विठ्ठल रुक्मिणी चरणी समर्पित
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिरे समितीचे सर्व सदस्य व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या प्रयत्नातून प्रतिवर्षाप्रमाणे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाचे दुसर स्वरपुष्प पद्मश्री पं.जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र व शिष्य पं.शौनक अभिषेकी आणि अभेद अभिषेकी यांनी गुंफले.
सुरुवातीला मंदिर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे,मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री, पं. शौनक अभिषेकी अभेद अभिषेकी सुधीर घोडके यांचे हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरुवातीला अभेद अभिषेकी यांनी राग पुरीया कल्याण गात शास्त्रीय संगीताचा वारसाही जपण्यासाठी अभिषेकी परिवाराची पुढची पिढी तितकीच सुंदर गात असल्याचे दाखवून दिले.
यानंतर पं.शौनक अभिषेकी यांच्या गायनाला सुरुवात झाली त्यांनी अभिजात भारतीय शास्त्रीय गायनातील राग अभोगी सादर करत प्रतिवर्षाप्रमाणे आई रुक्मिणी मातेच्या चरणी स्वराभिषेक करत कार्यक्रमाची सांगता केली . सर्व पंढरपूरकर रसिक मोठ्या संख्येने शेवट पर्यंत श्रोत्यांनी भरभरुन प्रतिसाद देत होते.त्यांना तबला सुभाष कामत, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनिय उदय कुलकर्णी, टाळ सुदर्शन कुंभार, मुकुटराव भगत यांनी साथसंगत केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सरांनी केले.या पुढेही ६ दिवस चालणाऱ्या या संगीत महोत्सवात ख्यातनाम गायक गायिका यांची उपस्थिती असणार असून दररोज सर्व रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.