मनसे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न

मनसे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

राज्यभरातून पुरस्कारास पात्र ठरलेल्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१०/२०२४- महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उपक्रमशील संस्था, उपक्रमशील शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी अशा ३२ जणांना मनसे नेते व सहकार सेनेचे राज्य अध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

हा मनसे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा रविवार दि.६ ऑक्टोबर २०२४ रोजी येथील शेठ मोरारजी कानजी सभागृह स्टेशन रोड पंढरपूर येथे मोठ्या दिमाखात पार पडला.या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून पुरस्कारास पात्र ठरलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कुटुंबासह उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर मनसे पुणे शहर महिला अध्यक्ष वनिता वागसकर, मनसे शिक्षक सेना प्रदेश सरचिटणीस जयवंत हक्के, मनसे शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके, मनसे शिक्षक सेना राज्य सचिव विश्वास गजबार, मनसे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, मनसे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, मनसे विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनसे सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अभिषेक रंपुरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे म्हणाले की शिक्षक शिक्षिका बंधू-भगिनींना कोणतीही अडचण त्यांच्या शैक्षणिक कार्याचे बाबतीत येत असेल तर मला जरूर सांगा मी इथे अडचण नक्कीच दूर करीन. आज या शिक्षक पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून गुणवंत शिक्षक हे या ठिकाणी आलेले आहेत. या शिक्षकांमध्ये नंदुरबार येथील एक शिक्षिका आदिवासी भागामधून आलेली आहे तिचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून आलेल्या शिक्षिका भगिनी आपल्या भाषणामध्ये म्हणाल्या की ८० टक्के आदिवासी मुलं हे शिक्षण घेत आहेत.

नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम भागात असलेल्या या शिक्षका भगिनींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे उद्गार दिलीप धोत्रे यांनी यावेळी काढले.

मनसे नेते दिलीप धोत्रे पुढे बोलताना म्हणाले की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब आहेत. आपल्या कोणत्याही अडीअडचणी समस्या सांगा आम्ही त्या अडचणीचे,समस्येचे निरसन केल्याशिवाय राहणार नाही व शिक्षक शिक्षकांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.

यावेळी अशोक कोळी, मनोज साळुंखे, बाळकृष्ण लाड, बाळासाहेब आवारे, परशुराम घाडगे, धुंडनना कोळी, मंगल मुळीक, जयश्री जमादार, वीरसंगप्पा भोज, युवराज जगताप, संतोष कोळी, विनायक शेळके, शरद काळे, सुरेश महानुर, अविनाश पाटील यांच्यासह पंढरपूर-मंगळवेढा येथील शहर व तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading