परिस्थिती नियंत्रणात?; महाजनकोत एका दिवसात ६०० मेगावॉटची वाढ
दुसरीकडे, महाजेनकोने पावसाळ्याआधी सूचना देऊनही कोळसा साठा केला नसल्याचे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने (वेकोलि) म्हटले आहे. ‘वेकोलि’ ही केंद्रीय कोळसा मंत्रालयांतर्गत असलेल्या कोल इंडिया लिमिटेडची (सीआयएल) उपकंपनी आहे. ‘महाजेनको’च्या प्रकल्पांना सर्वाधिक कोळसा ‘वेकोलि’कडूनच पुरवला जातो. जूनमध्ये राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाउनसदृश्य वातावरण होते. राज्यातील ऊर्जा मागणी कमी होती. त्यामुळे ‘महाजेनको’ने त्यावेळी ‘वेकोलि’ला पत्र लिहून दररोजच्या २२.५० रेक गाड्या कोळशाऐवजी १०.२ रेक कोळसा पुरवठाच करावा, असे पत्र लिहिले होते. पण पावसाळ्यात कोळसा उत्पादन प्रतिदिन सात लाख टनाने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी कोळसा साठा करून घ्यावा, असे ‘वेकोलि’ने ‘महाजेनको’ला सुचवले होते. पण, त्यावेळी हा कोळसा साठा केला गेला नाही. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये कोळशाची तूट निर्माण झाली, असे चित्र दिसून येत आहे.