पूर्व दिल्लीच्या सीबीडी ग्राउंड मध्ये आयोजित रामलीला मध्ये एक दुःखद घटना घडली आहे. इथे एलईडी पॅनल ठीक करणाऱ्या एक 20 वर्षीय तरुणाला करंट लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच धक्कादायक असे की, तरुणाच्या मृत्यूनंतर देखील कार्यक्रम थांबवण्यात आला नाही.
देशाची राजधानी दिल्लीत सुरू असलेली रामलीला सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. तसेच रविवारी विश्वकर्मा नगरमध्ये सुरू असलेल्या रामलीलेत रामाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे, तर आता पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदानावर एलईडी पॅनल दुरुस्त करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातानंतरही स्टेजिंग थांबविण्यात आले नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Edited By- Dhanashri Naik
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.