राहुल गांधी यांनी दलित कुटुंबाच्या घरी जेवण बनवले, व्हिडीओ शेअर करत म्हणाले

[ad_1]

rahul gandhi in kolhapur

Photo – Twitter

काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी एक व्हिडीओ शेअर केला या व्हिडीओ मध्ये ते एका दलित कुटुंबात जेवण बनवताना दिसले. दलित समाजातील अजय तुकाराम सनदे आणि त्यांची पत्नी अंजना सनदे यांच्या सोबत जेवण बनवताना दिसले. या वेळी त्यांनी पारंपरिक हरभऱ्याची भाजी, वांगी सह तूरडाळ शिकताना दिसत आहे. या वेळी शाहू पाटोळे यांनी दलितांच्या जेवणाची माहिती त्यांना दिली. राहुल गांधींनी सनदे कुटुंबियांशी गप्पा मारल्या. 

 

ते म्हणाले, दलितांना त्यांचे हक्क देणाऱ्या संविधानाचे रक्षण काँग्रेस करणार.

समाजात समानता तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रत्येक भारतीय बंधुतेची भावना मनात ठेवेल. 

त्यांनी X प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करत म्हटले, आजही फार कमी लोकांना दलितांच्या स्वयंपाकाची माहिती नाही.ते काय खातात, काय शिजवतात, हे कोणालाच माहिती नाही. त्याचे सामाजिक आणि राजकीय महत्त्व याबद्दल उत्सुकतेने मी अजय तुकाराम सानदे आणि अंजना तुकाराम सानदे यांच्यासोबत एक दुपार घालवली. 

https://platform.twitter.com/widgets.js

व्हिडीओ मध्ये ते स्वयंपाकघरात मदत करताना आणि नंतर कुटुंबियांसह जेवताना दिसत आहे. ते  म्हणाले, अजय कुटुंबीयांनी मला आदरातिथ्याने कोल्हापुरातील त्यांच्या घरी बोलावले आणि स्वयंपाक करण्याची संधी दिली.

दलितांनी खाल्लेल्या खाद्यपदार्थांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी आपण मराठीत एक पुस्तक लिहिले असून आता त्याचे ‘दलित किचन ऑफ मराठवाड्या’ असे इंग्रजीत भाषांतर करण्यात आल्याचे शाहू पटोले यांनी राहुल गांधी यांना सांगितले. 

Edited by – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top