अजितदादांवर टीका करून उत्तम जानकर यांनी आमदारकीचे स्वप्न बघू नये – श्रीकांत शिंदे

अजितदादांवर टीका करून उत्तम जानकर यांनी आमदारकीचे स्वप्न बघू नये – श्रीकांत शिंदे

गणपती दारू पितो या वक्तव्याचा केला निषेध

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/१०/२०२४ – शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माळशिरसचे उत्तम जानकर हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीका करून आपली किंमत वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी खा.शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत भाषणबाजी करताना भगवान श्री गणेशाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत उत्तम जानकर यांनी त्यांच्या अकलेचे तारे तोडले आहेत व त्यांची बुध्दी व विचार करण्याची मानसिकता किती खालच्या पातळीवर गेली आहे हे दाखवून दिले यापूर्वी श्री गणेश दुध पितात ही अनेक वर्षापासून ऐकले आहे मात्र उत्तम जानकर यांनी  गणपती दारू पितो असे वक्तव्य करत गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांचा मी निषेध करतो   तसेच अजितदादांवर टीका करून उत्तम जानकर यांनी आमदार होण्याचे स्वप्न पाहू नये अशी जोरदार टीका अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंबावर आज पर्यंत टीकाटिप्पणी करून मोठं होवून मोठे झालेल्या उत्तम जानकरांनी आपलं कर्तृत्व तरी काय हे सिद्ध करावे आणि मग अजित दादांवर टीका करावी अजितदादांनी ग्रामपंचायत पासून ते राज्याच्या वैभवशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी दिवस रात्र एक केले आहे आणि जगाच्या नकाशावर बारामती पॅटर्न हे एक आदर्शवत शहर निर्माण केलेल्या असून उत्तमराव जानकर यांनी ग्रामपंचायत ती आपल्याकडे ताब्यात असताना आपण काय विकास केला हे तरी जनतेसमोर ठेवावे उत्तम जानकर हे विचाराने कर्तुत्वाने जरी मोठे असले तरी नेतृत्वाने शून्य आहेत हे त्यांनी असल्या वाचाळ बडबडीतून दाखवून दिले आहे आणि देत आहेत कारण विकासावर काय बोललं पाहिजे विकास कशा पद्धतीने केला पाहिजे हे यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत कधीही जनतेसमोर मांडता आले नाही फक्त विरोधकांना टार्गेट करायचे आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे यांचे राजकीय कर्तृत्व त्यामुळे अजित दादांवर वारंवार बोलून अजित दादा तुम्हाला काहीतरी उत्तर देतील आणि तुम्ही पुन्हा प्रकाश झोतात याल हे स्वप्न तुमचे दिवा स्वप्न राहणार आहे अजित दादा तुम्हाला कधीही कृती उत्तर देणार नाहीत कारण तेवढा आपला कर्तृत्वच नाही त्यामुळे टीकेला प्रत्युत्तर देणे पद अजितदादा ही लहान नाहीत हे उत्तम जानकर यांनी लक्षात घ्यावे असे म्हणून श्रीकांत शिंदे यांनी समाचार घेतला आहे

जे स्वप्न पाहून उत्तम जानकर महायुती मधून महविकास आघाडी मध्ये प्रवेश केला ते स्वप्न गणपती बाप्पा कधी साध्य होऊ देणार नाही कारण आपला दाखला हा बोगस आहे हे येत्या काही दिवसांत समोर येईल त्यामुळे अजितदादा वर टिका करण्यापेक्षा अजितदादा सारखा विकास करून दाखवा, गणेश भक्तांना उत्तम जानकर यांनी केलेले वक्तव्य मान्य असेल तर माहविकास आघडीच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन ही श्रीकांत शिंदे यांनी केले आहे


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading