उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणूक बारामती मतदार संघातून लढवणार



महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. 

आगामी विधानसभा निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती मतदार संघातून लढवणार आहे. अशी घोषणा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली. मी जाहीरपणे ही घोषणा करतो की आमचे पक्ष प्रमुख अजित पवार बारामती मतदार संघातून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला चांगली कामगिरी करता आली नाही, या पक्षाने केवळ एकच जागा जिंकली.बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली.

या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी वाहिनी सुनेत्रा पवार यांचा मोठा फरकाने पराभव केला.यामुळे त्यांच्या पक्षासाठी आणि वैयक्तिकरित्या अजित पवार यांच्या संभाव्यतेबद्दल चिंता निर्माण झाली. नुकत्याच एका मुलाखतीत अजित पवारांनी कबुल केले की पत्नी सुनेत्रा पवार यांनी बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात बारामतीतून निवडणूक लढवणे मोठी चूक होती. कुटुंबात कधीही राजकारण आणू नये असे ते म्हणाले.

दुसऱ्या प्रसंगी, एका जाहीर सभेत, त्यांनी असेही सांगितले की त्यांना बारामतीतून निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, ज्यामुळे त्यांचा मुलगा जय पवार या जागेवरून निवडणूक लढवणार अशी अटकळ बांधली जात होती. खुद्द अजित पवार हडपसर, शिरूर अशा इतर मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशीही शक्यता वर्तवली जात असताना आता अजित पवार खुद्द  बारामती मतदार संघातून निवडणूक लढवणार हे निश्चित झाल्यावर आता शरद पवार कोणाला उमेदवारी देतील या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

Edited By – Priya Dixit 

 



Source link


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading