Durga Ashtami Upay शारदीय नवरात्रीत दुर्गा अष्टमीचे खूप महत्त्व असते. दुर्गाष्टमीला तुळशी संबंधी काही उपाय केल्याने अद्भुत लाभ प्राप्त होऊ शकतात. तर जाणून घेऊया उपाय आणि त्याने मिळणारे फायदे कोणते-
दुर्गाष्टमीच्या दिवशी तुळशीचे हे उपाय करा Durga Ashtami Tulsi Upay
शारदीय नवरात्रीच्या अष्टमी तिथीला तुळशीचे 5 पाने घेऊन त्यांना लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवा. याने धन बाधित करणारे दोष दूर होतील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल
अष्टमी तिथीला दुर्गा देवीला तुळशीच्या पानांचा हार तयार करुन घालावा. याव्यतिरिक्त आपण मधात तुळशीची पाने भिजवून देवीला नैवेद्य दाखवू शकतात. याने धन वृद्धी आणि धन येणाचे मार्ग मोकळे होतील.
तसं तर तुळस जाळणे वर्जित मानले गेले आहे मात्र ज्योतिष शास्त्रात तुळशीचे पाने कापुरासह जाळल्यास याला शुभ मानले जातात. असे केल्याने कर्ज, गरिबी इत्यादी समस्या दूर होतात.
शारदीय नवरात्रीच्या अष्टमी तिथीला माँ दुर्गेची पूजा केल्यानंतर देवी आणि तुळशी मातेला लाल रंगाची चुनरी अर्पण करा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात.
अस्वीकारण: ही माहिती धार्मिक आणि ज्योतिष श्रद्धेवर आधारित असून केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.